कृषी महाविद्यालय मूल... शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एकोणतीसावी बैठक संपन्न

 कृषी महाविद्यालय मूल...

 शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एकोणतीसावी बैठक संपन्न


मूल २१: दीपक देशपांडे.

 कृषी महाविद्यालय, मूल आयोजित *एकोणतीसावी* शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २० मे, २०२५ रोजी ग्राम चिमढा ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. या प्रसंगी चिमढा येथील प्रगतशील शेतकरी श्री. अरविंद केळझरकर, श्री धनराज मोहुर्ले, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने *“खरीप पिकांचे नियोजन”* या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी शेतकऱ्यांना शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी, खरीप हंगामाच्या सुरवातीला घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतीची योग्य मशागत करणे, माती परीक्षण करणे, योग्य वाणाची निवड करणे, बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे याप्रसंगी सांगितले. त्याचप्रमाणे *विकसीत कृषि संकल्प अभियानाचे आयोजन दिनांक २९ मे ते १२ जून २०२५* या कालावधीत करण्यात येत असून गावोगावी जाऊन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे, त्यामध्ये भारतिय कृषि अनुसंधान परिषद, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र व इतर सलग्न संस्था यांच्या सहभागाने आयोजित करण्यात येत आहे व या अभियानामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान याप्रसंगी केले. त्यानंतर *कृषिविद्या* विषयतज्ञ सहाय्यक प्राध्यापिका *मोहिनी पुनसे* यांनी शेतकऱ्यांनी माती परिक्षणासाठी मातीचे नमुने कसे घ्यायचे, धानामध्ये बीज उगवण क्षमता चाचणी करून पेरणी करावी व धान पिकामध्ये मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया केल्यास होणारे फायदे शेतकऱ्यांना पटवून दिले. *उद्यानविद्या* विषयतज्ञ *डॉ. अश्विनी गायधनी* यांनी खरीप हंगामाच्या सुरवातीला भाजीपाला पिकांची जसे मिरची, वांगी व टमाटर यांची रोपवाटिकेत घ्यावयाची काळजी, इतर वेलवर्गीय पिकांची लागवड व शेवगा लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच नवीन फळबाग लागवड (आंबा, बोर, सीताफळ ई.) व फुलशेती करण्यास प्रोत्साहित केले. त्याचप्रमाणे साध्यास्थितीत  भाजीपाला पिकांमध्ये आवश्यक असलेले सेंद्रिय आच्छादनाचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले. *वनस्पती रोगशास्त्र* विषयतज्ञ *डॉ. प्रविणा बरडे* यांनी खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांनी जैविक बुरशीनाशके व जीवाणूनाशके जसे उदा. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस तसेच जैविक खते जसे रायझोबीयम यांसोबत बीजप्रक्रिया केल्यास पिक रोगमुक्त राहते असे याप्रसंगी शेतकऱ्यांना सांगितले. तसेच जैविक विघटक वापरून शेतावर असणारे धसकटे आणी काडीकचरा उत्तम खतामध्ये कसा परिवर्तीत करता येतो याबाबत सविस्तर माहिती दिली. *किटकशास्त्र* विषयतज्ञ *भूषण ठाकरे* , यांनी खरीप हंगामामध्ये धान कापूस भाजीपाला पिके यांवर येणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कापूस पिकावर येणाऱ्या गुलाबी बोंडअळीसाठी आणि धान पिकातील खोडकिडीसाठी पेरणीपूर्व कोणकोणत्या उपयोजना केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच इतर मित्र कीटक, जैविक-किडनाशके जसे ट्रायकोग्रामा (परोपजीवी कीड), बिवेरीया, मेटारीझीयम यांची ओळख व त्यांचे होणारे फायदे शेतकऱ्यांना पटवून दिले. त्यांनतर सहाय्यक प्राध्यापक *कृषिविद्या* विषयतज्ञ *देवानंद कुसुंबे* , यांनी धान पिकासाठी रोपवाटिका तयार करतांना घ्यावयाची काळजी, योग्य वाणाची निवड, तण, खत व पाण्याचे नियोजन कसे करावे यावर  सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी चिमढा गावाचे श्री. अरविंद केळझरकर, श्री धनराज मोहुर्ले यांना कृषी महाविद्यालय मूल निर्मित गांडूळखत भेटस्वरुपात देण्यात आले व गावामध्ये गांडूळखत प्रकल्प सुरु करावेत अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली. 

सदर कार्यक्रमास एकुण *२९ शेतकरी* व *७ शास्त्रज्ञ* उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार *कृषी विस्तार शिक्षण* विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका *मनीषा लवणकर* यांनी मानले.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.