अंतर्नाद... २६ भगिनींच्या दहशतवाद्यांकडून पुसल्या गेलेल्या कुंकवाचा घेतला बदला

अंतर्नाद...

२६  भगिनींच्या दहशतवाद्यांकडून पुसल्या गेलेल्या कुंकवाचा घेतला बदला




हिंदू संस्कृतीत महिलांनी त्यातही विशेषतः विवाहित महिलांनी कपाळावर मधोमध कुंकू लावणे आणि केसाच्या भागात सिंदूर  भरणे हे सौभाग्याचे लक्षण समजले जाते. आज २१ व्या शतकातील २४ वर्ष उलटलेली असली तरी देखील प्रगत भारतातील अर्ध्याहून अधिक महिला हा रिवाज प्रकर्षाने आणि अभिमानाने पाळतात. गेल्या काही वर्षात काही कविता स्त्रीमुक्तीवाल्या प्रगत समजणाऱ्या महिला हे कुंकू लावणे आणि  भांगात सिंदूर भरणे हे मागासलेपणाचे लक्षण समजत असतीलही. मात्र बहुसंख्य महिला अजूनही हा रिवाज पाळतात. 

भारतीय संस्कृतीत जे काही रिवाज पाळले जातात, त्यामागे काही वैज्ञानिक पार्श्वभूमी देखील आहे. तसेच कपाळावर कुमकुम  तिलक लावण्यामागे देखील वैज्ञानिक परंपरा आहे. त्यामुळे असे कुंकू हे आवर्जून लावलेच जाते. 

प्राचीन रीतीरीवाजानुसार विवाहित स्त्रीच्या कपाळावर कुंकू नसणे हे अशुभपणाचे लक्षण समजले जाते. जुन्या काळात महिला विधवा झाल्यावर तिच्या कपाळाचे कुंकू पुसण्याची परंपरा होती. 

हे सर्व मुद्दे लक्षात घेता कपाळावरील कुंकू आणि भांगातील सिंदूर याला किती महत्त्व आहे हे वाचकांच्या लक्षात येईलच. मात्र आपल्या २६ भगिनींच्या कपाळावरील कुंकू आणि भांगातील सिंदूर पुसण्याचे पाप २२ एप्रिल २०२५ रोजी भर दुपारी काश्मिरातील पहेलगाम येधे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले. पहेलगाम येथे पर्यटक म्हणून गेलेल्या पर्यटकांमध्ये त्यांनी पुरुषांना बाजूला केले त्यांचा धर्म विचारला त्यांना कुराणातील कलमा म्हणायला सांगितल्या इतकेच काय तर पॅन्ट उतरवून त्यांची सुद्धा झाली आहे काय, हे देखील पाहिले नंतर त्यातील हिंदू पुरुषांना त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालून ठार मारले. या सर्वांच्या पत्नी तिथेच होत्या . त्यातील एका महिलेने मलाही मारा, अशी विनंती करताच त्या दहशतवाद्याने तुला नाही मारत जा, जाऊन सांग तुझ्या मोदीला, असे उत्तर दिले. 

दहशतवाद्यांच्या या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्याने उभा देशच नव्हे, तर उभे जग हादरले. देशभरात संताप व्यक्त केला जाऊ लागला. या दहशतवाद्यांना ठेचून मारा अशी भावना व्यक्त होऊ लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आम्ही स्वस्थ बसणार नाही, तर हे दहशतवादी आणि त्यांचे आका पाताळात दडले असले तरी त्यांना शोधून काढू आणि शिक्षा देऊ असे देशाला आश्वस्त केले. 

सरकार काहीतरी कारवाई करेल या आशेवर सर्वच जण वाट बघत होते. ती शेवटी आजची सकाळ उजाडली, आणि बातमी आली, की भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करून पाकव्याप्त पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे पाच अड्डे आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे चार अड्डे मिसाईलच्या मदतीने उध्वस्त केले. या मोहिमेला पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन  सिंदूर असे नाव दिले होते. आज ७ मे च्या पहाटे १.५ ते १.३० च्या दरम्यान लष्कराने हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले. त्यात अनेक दहशतवादी संघटनांचे काही म्होरके ठार झाले असून पन्नासच्या वर दहशतवादी देखील गारद झाले आहेत. उभा देश या बातमीने सुखावला आहे. भारत सुद्धा पाकिस्तानला धडा शिकवू शकतो, घरात घुसून मारू शकतो, हे भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या २६ भगिनींच्या कपाळावरील पुसल्या गेलेल्या कुंकवाची किंमत वसूल केली आहे, त्यांच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदला घेतला,असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये. म्हणूनच मोदींनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. २२ एप्रिल रोजी जे पुरुष मारले गेले होते त्यांच्या पत्नींनी देखील आमच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाची किंमत खऱ्या अर्थाने वसूल झाल्याची भावना व्यक्त केली आहे. 

हे बघता महिलेच्या कपाळावरील कुंकवाची आणि तिच्या भागातील सिंदूराची किंमत किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येईलच. आपले पंतप्रधान हे भारतीय संस्कृतीचे जतन करणारे असे नेते आहेत. भारतीय संस्कृतीत प्रत्येक स्त्रीला आपली भगिनीच मानले गेले आहे. त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने या भगिनींना न्याय दिला आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरु नये. 

या निमित्ताने आज पहाटे भारतीय लष्कराने घडवलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक  व्यक्तीला मानाचा मुजरा. तसेच सर्व भारतीयांचे अभिनंदन. *भारत माता की जय* 

अविनाश पाठक, नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.