मूल तालुक्यातील १० पैकी ५ आधार केंद्र बंद?

 मूल तालुक्यातील १० पैकी ५ आधार केंद्र बंद?

नागरिकांना त्रासदायक!

मूल :- मूल शहरातील प्रशस्त प्रशासकीय भवन परिसरात एका डौलदार इमारतीत हे आधार केंद्र कार्यरत आहे ,मात्र आधार केंद्रावरील आपरेटर ब्लाक झाल्याने हे आधार केंद्र कित्येक दिवसांपासून बंद आहे,शासन यंत्रणेने पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे.

शासकीय योजनांसह दैनंदिन व्यवहारात आधार कार्डचे महत्त्व वाढले आहे आणि जून्या आधार चे नुतनीकरण करणे आवश्यक आहे परिणामी जनतेचा ओढा या आधार केंद्राकडे वाढत असून तालुक्यातील  निम्मेच आधार केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे मात्र याबाबत कुठेही आवाज उठवला जात नाही की प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत नाही.

 नागरिकांना नवीन आधार कार्ड आणि आधार मधील  फेरफार , नुतनीकरण आणि आधार अपडेट करण्यासाठी सेवा मिळण्यासाठी शासनाच्या वतीने मूल तालुक्यात १० आधार केंद्र सुरू करण्यात आले होते, यापैकी आजच्या स्थितीत ५ आधार केंद्र बंद असल्याची माहिती पुढे आली आहे.

मूल तालुक्यात मूल शहरातील तहसील कार्यालय परीसरातील आधार केंन्द्र ,पंचायत समिती परीसरातील  आधार केंन्द्र , मूल उपविभागीय अधिकारी कार्यालय परीसरातील आधार केंद्र , ग्रामीण भागातील ग्रामपंचायत बेंबाळ कार्यालय आधार केंद्र, ग्रामपंचायत फिस्कूटी कार्यालय आधार केंद्र , पशूवैद्यकिय दवाखाना चिरोली आधार केंद्र ,चिखली आधार केंद्र ,महिला व बालकल्याण ​अधिकारी कार्यालय मूल अंतर्गत ग्रामपंचायत चांदापूर आधार केंद्र ,ग्रामपंचायत भेजगाव आधार केंद्र ,ग्रामपंचायत राजोली आधार केंद्र असे दहा आधार केंद्र मंजूर असून त्यापैकी निम्मे आधार केंद्र बंद आहेत ,परिणामी या केंद्रावर गर्दी वाढल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

उपलब्ध आधार केंद्रावर  दिवसातून फक्त २५ ते ३० नवीन आधार कार्ड तयार केले जात असून या दरम्यान विद्युत पुरवठा, इंटरनेटच्या  व्यस्ततेमुळे नेटवर्क सेवा ठप्प झाली की, गर्दी वाढत जाते आणि कामे रखडली जात आहेत. 

ग्रामीण भागातील नागरिक जेव्हा त्यांचे काम  कुठेतरी अडते तेव्हा घाईगडबडीने नवीन आधार कार्ड वा आधार अपडेट करण्यासाठी बस टॅक्सी, मोटारसायकलने  मूल येथील आधार केंद्रात येतात आणि काम झाले नाही तर वारंवार चकरा मारत आहेत परंतू मूल येथे २ सेवा केंद्र बंद असल्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे ठरत असून प्रत्येक व्यवहारांमध्ये ऑनलाइन कामासाठी आधार कार्डची गरज आहे. याबाबत प्रशासनाने  लक्ष देऊन कार्यवाही करावी, व मंजूर आधार केंद्र बंद राहणार नाहीत व जनतेच्या  सोयीसाठी   हे आधार केंद्र तातडीने सुरू करावेत अशी मागणी जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संघटनेचे वतीने हे आधार केंद्र बंद असण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता मार्च २०२५ महिन्यासाठी DQDR यादी मध्ये आधार सुपरवायझर बंद पडल्याने आधार केंन्द्र बंद पडलेले आहे त्यासाठी लोकसंख्याशास्त्रीय डेटा जुळत नाही,मंजूर यादीनुसार दस्तऐवज नाही,ओव्हरराइट केलेले दस्तऐवज, डेमोग्राफिक डेटा जुळत नाही,खराब दर्जाचा दस्तऐवज अशी कारणे दाखवून संगणक आपरेटर ब्लाक करण्यात आले, आधार आपरेटर बंद झाल्याने आधार केंन्द्र बंद पडलेले आहे. 

नवीन ऑपरेटर बनण्यासाठी, आधार परीक्षा देण्यासाठी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेल्या प्रमाणपत्राची गरज असते ते प्रमाणपत्र मिळत नसल्याने परीक्षा कशी द्यायची हा प्रश्न आधार संचालकांना पडल्यामूळे सुशीक्षित बेरोजगारांना परीक्षाही देता येत नाही.

केंद्र ऑपरेटर आयडीला होतोय उशीर 

ऑनलाइन यूआयडीईआयमार्फतऑपरेटर आयडी क्रिडेन्शियल बनण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे आधार केंद्रावरील कुठलेही काम करता येत नसल्याने मूलमधील दोन आधार सेवा केंद्र तीन महिन्यापासून बंद पडले असल्याचे येथील केंद्र चालक यांनी सांगितले आहे.

अनेक दिवसांपासून ही सेवा प्रभावीत होत आहे.

आधार केंद्रावर शून्य ते अठरा  वयोगटातील लहान मुलांची नवीन आधार नोंदणी करणे तसेच  मुलीच्या लग्नापूर्वीचे आधार कार्डवरील नावात बदल करणे आदी कामे  रखडली आहेत मात्र हे करण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, निवडणूक ओळखपत्र आवश्यक असते त्यानंतरच विवाहितेचे आधार नाव दुरुस्त केले जाते.याशिवाय आधार नाव दुरुस्त करणे जन्मतारीख, पत्ता दुरुस्त करणे,मोबाइल नंबर बदल करण्याचे काम आधार केंद्रावर केले जातात मात्र ग्रामीण भागातील आधार केंद्र बंद असल्यामुळे त्यांचा ओढा मूल शहराकडे आहे आणि मूल शहरातील दोन आधार  सेवा केंद्र बंद असल्यामुळे ही सेवा विस्कळीत झाली आहेत, परिणामी येथील एका केंद्रावर प्रचंड गर्दी वाढत असून बऱ्याच ग्राहकांना सायंकाळी  वेळ झाल्यावर माघारी जावे लागत आहे.

 ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी  जागृत ग्राहक राजा चे वतीने  नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी मूल तालुका व चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडे  केली आहे ,व तातडीने जिल्हा प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शासनाकडे केली आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.