दहावीच्या परीक्षेत मूलच्या शाळांची गुणवत्ता आणि परंपरा कायम.

 दहावीच्या परीक्षेत मूलच्या शाळांची गुणवत्ता आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

दीपक देशपांडे मूल 

माउंट काॅन्व्हेंट ॲन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल.

महाराष्ट्र, मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल चा निकाल शंभर टक्के लागला आहे. यंदा १० वीच्या परीक्षेला शाळेतील एकूण ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यात सर्वजण उत्तीर्ण झाले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रशासन आणि शिक्षक मंडळींकडून अभिनंदन करण्यात आले आहे. या यशस्वी यादीत शाळेची विद्यार्थिनी कु. किमया किरण खोब्रागडे हिने ९५.६० % गुण मिळवून तालुक्यातून व शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला. कु. अदिती किशोर भोयर हिने ९२.२००% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर गौरी मिलिंद गोंडरलवार हिने ९०.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भाऊराव झाडे, मुख्याध्यापिका रिमा कांबळे वर्गशिक्षक अशपाक सय्यद,  विषय शिक्षक शिक्षिका इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल.

शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित बल्लारपूर पब्लिक स्कूल मूलचा निकाल १००% लागला असून शाळेने ही परंपरा कायम राखली आहे.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मूल.
या शाळेने
 आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असली तरी यावर्षी ही शाळा १००% निकाल देऊ शकली नाही.
शाळेतील विद्यार्थीनी सलोनी विनोद पिंपळकर हिने८८.२०%गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर मानसी मुरलीधर नरुले हिने ८७.६०%गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक मिळवला आहे आणि गितांश बंडू टिंगुसले आणि कुणाल छगनलाल पर्वते यांनी ८५.४०%गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला आहे.
शाळेतील एकुण ११६विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी १०२विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांची एकूण टक्केवारी ८८.९३%आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा माजी मंत्री शोभाताई फडणवीस, व्यवस्थापन समिती सदस्य आणि मुख्याध्यापक नितीन घरोटे यांचेसह शाळेतील शिक्षक वृंदाने अभिनंदन करीत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.