महाब्रेकिंग वाघाचा कहर : तेंदूपत्ता संकलन करताना आणखी एका महिलेचा मृत्यू.
महाब्रेकिंग
वाघाचा कहर : तेंदूपत्ता संकलन करताना आणखी एका महिलेचा मृत्यू.
परिसरात तिनं दिवसांत पाच महिलांचा मृत्यू.
मूल, दीपक देशपांडे.
चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास सुरुवात झाली असून जंगलालगतच्या गावातील नागरिक आपली रोजी रोटी भागविण्यासाठी वाघाची भीती असतांना देखीलतेंदुपत्तासंकलनासाठी जात असतात.
आज १२ मे २०२५ रोजी मूल तालुक्यातील भादुर्णी येथील महिला भुमिका दिपक भेंडारे (३०) मु. केवाडा (पेट) येथील असून भादुर्णी येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी आहे,ही सकाळी ८ वाजता तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली असता जंगलात झुडुपांमध्ये असलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करुन तिला जागीच ठार केले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M

Comments
Post a Comment