रानटी डुकरांचा चिरोली गावात धुमाकूळ तीन महिला जखमी

 ब्रेकिंग न्यूज.

रानटी डुकरांचा चिरोली गावात धुमाकूळ तीन महिला जखमी     

दीपक देशपांडे मूल.

  मूल तालुक्यातील चिरोली येथे सकाळी ८ वाजता रानटी डुकराने चक्क गावामध्ये येऊन हैदोस माजविल्याने तीन महिला जखमी झाल्या यात कु. शिवण्या प्रेमदास केस्तावार( ९) सीताबाई देवजी येरमलवार (६०) बेबी बाई कुंभारे,(६५) हे गंभीर जखमी झाल्या.

 या घटनेबाबतची माहिती काँग्रेस नेते संतोष रावत यांना मिळताच त्यांनी त्वरित काँग्रेस  सुत्रे हालवली व कार्यकर्ते यांना कळविले.तेंव्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र वाढई, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, प्राणीमित्र उमेश झिरे, क्षेत्र सहाय्यक खणके, वनरक्षक एस जी. गेडाम  वनरक्षक येसांबरे,वनरक्षक ठाकूर यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे. या प्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी रुग्णांना  भेटी देऊन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. असून एका लहान मुलीला चांगलाच रक्तस्त्राव झाल्याने गंभीर  आहे. पुढिल उपचार सुरू आहेत.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.