महाब्रेकिंग:-नगरपरिषद मूल ने काढली प्रेस नोट?
महाब्रेकिंग:-
नगरपरिषद मूल ने काढली प्रेस नोट ?
मूल, दीपक देशपांडे
मूल शहरातील अनेक तरुणांना नगरपरिषद मध्ये नौकरी (रोजगार) उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करुन लुबाडले जाण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती आणि अनेक गरजू तरुणांना भुलथापा देऊन फसवणूक केली जात होती,मात्र कुणीही समोर येऊन तक्रार करीत नव्हते.
आज दिनांक २०मे २०२५रोजी नगरपरिषद मूल चे वतीने प्रस्तुत प्रेस नोट प्रसिद्ध केली गेल्याने या हवेतील चर्चेला पाठबळ मिळाले असून आजवर केवळ चर्चा असलेल्या या घटनेची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरुन पुढे आली आहे.
प्रेस नोट:-नगरपरिषद मूल कार्यालयातर्फे नागरिकांना कळविण्यात येते कि, नगरपरिषद आस्थापनेवरील कोणत्याही पदाकरिता पदभरती निघालेली अथवा प्रस्तावित नसून नगरपरिषद मूल पदभरती संदर्भातील कोणत्याही अनधिकृत सोशल मिडीयावरील / मोबाईल संदेश / व्हाट्स अॅप इत्यादी वरील बातमीकडे लक्ष देवू नये. व कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. अधिकृत बातमीकरीता शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा. करीता नागरिकांच्या माहितीस सदर प्रेसनोट प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यावर मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी आहे.
भविष्यात हा विषय नेमके कोणते वळण घेणार आणि या प्रकरणात कोणकोणते छोटे मोठे मासे गळाला लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M


Comments
Post a Comment