दखल निवेदनाची , आदेश पारित, अंमलबजावणी होणार?

 दखल निवेदनाची, आदेश पारित, अंमलबजावणी होणार?

चंद्रपूर, न्यूज ब्युरो.

"जागृत ग्राहक राजा"नागपूर विदर्भ प्रांताचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी मूल तालुका पदाधिकारी यांचे सह तहसीलदार मूल यांना दिनांक २१मे रोजी मान. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे नांवे जिल्ह्यातील विविध सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयी आणि अकारण सर्वसामान्य नागरिकांना शपथपत्र बनविण्यासाठी बाध्य करुन त्यांची लुबाडणूक होत असल्याबाबत निवेदन सादर केले,व शासननिर्णय असतांना शपथपत्र बनविण्यासाठी बाध्य करण्याचा व नियत वेळेत प्रमाणपत्र वितरित करण्यात होत असलेला विलंब टाळण्याची व नियमानुसार कार्यवाही करण्याची विनंती केली होती.

हे निवेदन सादर करताना केलेल्या चर्चेतून मूल तहसील कार्यालयात असलेल्या सेतू केंद्रात काही बाहेरील व्यक्ती लिखापढीचे काम करीत असून त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज भरुन घेणे व शपथपत्र बनविण्यासाठी बाध्य करण्याचा प्रकार सुरू असल्याचे पुढे आले आणि हा प्रकार तातडीने थांबविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली गेली.

यांवर आम्ही तातडीने कारवाई करु असे आश्वासन देत तहसीलदार मृदूला मोरे यांनी उद्या म्हणजे गुरुवारी सकाळी एका नायब तहसीलदारांना सेतू सुविधा केंद्रात पाठवून अशा अवैधरित्या सेतू सुविधा केंद्रात बसणाऱ्या लोकांना हेरुन तहसीलदार यांचे समोर उभे करण्याचे व असा गैरप्रकार मूल तहसीलच्या कोणत्याही सेतू केंद्रात चालणार नाही यासाठी आवश्यक सुचना देण्यात येतील असेही आश्वासन दिले.

त्याची पूर्तता करताना दिनांक २३मे रोजी पत्र क्रमांक/कावि/अ.का./सामान्य /२०२५/३०२अन्वये मूल तालुक्यातील सर्व सेतू केंद्र /आपले सरकार केंद्र/महाऑनलाईन केंद्र चालकांना एका पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत व शपथपत्राची सक्ती न करता स्वघोषणापत्रान्वये सर्व कागदपत्रे वितरण करण्याचे सुचीत केले आहे.

या पत्रामुळे ग्राहकांना नाहक शपथपत्र सादर करण्यासाठी १००रुपयांचा मुद्रांक व लिखाणासह कागदपत्रे  १००₹असे एकुण किमान २००₹बचत होऊ शकणार आहे. 

अशीच कार्यवाही जिल्ह्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रात लागू केली जावी त्यासाठी  जिल्हाधिकारी यांनी  आदेश काढावा अशी मागणी दीपक देशपांडे यांनी केली आहे.

याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भ प्रांतातील सर्वच जिल्ह्यांत कुठेही ग्राहकांची  फसवणूक व लुबाडणूक होणार नाही यासाठी ही योजना राबविण्यात यावी अशीही मागणी जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने दीपक देशपांडे यांनी केली असून शासनाच्या निर्देशानुसार त्याची अंमलबजावणी केली जावी अशी कामना केली आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.