सहज सुचलं म्हणून.... सिंदूर (शेंदूर)चे महत्त्व
सहज सुचलं म्हणून ...
सिंदूर (शेंदूर)चे महत्त्व
या हल्ल्याच्या उत्तरात भारत सरकारने ७ मे च्या पहाटे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधील एकूण नऊ दहशतवादी अड्ड्यावर मिसाईलच्या मदतीने हल्ला केला आणि हे अड्डे अक्षरशः बेचिराख केले. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते. तेव्हापासून एरवी भारतीय संस्कृतीत महिलांच्या दैनंदिन साजशृंगारापुरता आणि पुरुषांकरिता पूजेत वापरण्याचा एक पदार्थ सिंदूर इतकाच माहीत असलेला हा शब्द आता सर्वांच्या तोंडोतोंडी झालेला आहे. सिंदूर म्हणजेच आपल्या मराठी भाषेतला शेंदूर, हा शेंदूर दररोजच्या पूजेत विशेषतः गणपतीच्या मूर्तीवर वाहण्यासाठी वापरला जातो. गणपतीचा हा शेंदूर अतिशय आवडता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच हिंदीत "शेंदूर लाल चढाओ अच्छा गजमुखको" अशी एक आरतीही आहे. त्याचबरोबर जेव्हा लक्ष्मी किंवा कोणत्याही देवीचे पूजन केले जाते, त्यावेळी देखील सिंदूर भरणाचा एक विधी असतो. तिथेही हा चिमुटभर शेंदूर वापरला जातो. त्यासाठी आपल्याला दिवसाकाठी जेमतेम चिमूटभर शेंदूर लागतो.
हा शेंदूर आपल्याला भूकटी स्वरूपात उपलब्ध होतो. मात्र प्रत्यक्षात तो कसा बनतो याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. शेंदूर म्हणजेच सिंदूर हा एका झाडाच्या फळांपासून तयार केला जातो. या झाडाला इंग्रजीत कॅमेला ट्री असे म्हणतात. या झाडाची लागवड अमेरिकेत जशी होते, तशीच आपल्या भारतात हिमालय पर्वत परिसरातही होत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी ही झाडे लावली जातात. जाणकारांच्या मते आपण आपल्या घरी देखील कुंडीत हे झाड लावू शकतो. हे झाड छोटेसेच असते. थोडे मोठे झाले की त्याला बारीक बारीक फळे येतात. त्या फळांची भुकटी करून त्याचा शेंदूर बनवला जातो.
भारतातील काही प्रांतांमध्ये या शेंदुराचा उपयोग महिला विवाहित महिला आपल्या भांगात भरण्यासाठी करतात. ते आपल्याकडे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. लग्नात लाजा होमानंतर सर्वप्रथम पती आपल्या पत्नीच्या अंगात शेंदूर भरत असतो. त्यानंतर जोवर ती पत्नी सौभाग्यवती असते, तोवर तिने भांगात शेंदूर नियमित भरायचा असतो.
आपल्या महाराष्ट्रासह इतर काही प्रांतात मात्र भागातील शेंदूरसह कपाळाच्या मधोमध कुंकू लावण्याची प्रथा प्रचलित आहे. हे कुंकू हळद आणि चुना यांच्या मिश्रणातून बनवले जाते असे म्हणतात.
हा शेंदूर फक्त महिलांनी भागात भरण्यासाठी किंवा गणपतीला चिमूटभर वाहण्यासाठी वापरला जातो असे नाही, तर मोठमोठ्या मंदिरातील मूर्तींना या शेंदुराचा लेप देखील दिला जातो. त्यासाठी या शेंदुराच्या भुकटीला गोड्या तेलात मिसळले जाते आणि ते मिश्रण मूर्तीवर लेपले जाते. म्हणूनच बऱ्याचशा जुन्या मंदिरातील दगडाच्या मूर्ती आपल्याला शेंद्री रंगाच्या दिसतात.
त्याचप्रमाणे या सिंदुराचा म्हणजेच शेंदराचा उपयोग औषधी म्हणून देखील केला जातो. आयुर्वेद शास्त्रात हा औषधी पदार्थ म्हणूनही वापरतात.
अशा या शेंदराला म्हणजेच सिंदूराला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर एक तर या शेंदुराचा रंग गडद लाल असतो. हा रंग रक्ताचा म्हणजेच क्रांतीचा देखील आहे. म्हणूनच हा रंग शौर्याचे प्रतीक देखील मानला जातो. त्यामुळेच या रंगाला महत्त्व असण्याचे तेही एक कारण आहे.
२२ एप्रिल च्या दहशतवादी हल्ल्यात त्या चार क्रूरकर्म्यांनी २६ पुरुषांना त्यांचा धर्म विचारून ते हिंदू धर्मीय आहे हे नक्की केल्यावर गोळ्या घालून ठार मारले, त्यावेळी या दुर्दैवी पुरुषांच्या पत्नी देखील तिथेच उपस्थित होत्या.या दहशतवाद्यांनी या २६ भगिनींच्या कपाळावरचे कुंकू मिटवले आणि त्यांच्या भागातील सिंदूर देखील पुसला. त्या भगिनी जेव्हा म्हणाल्या की आम्हालाही मारा तेव्हा आम्ही तुम्हाला मारत नाही, तुम्ही तुमच्या मोदींना जाऊन सांगा असे उत्तर या दहशतवाद्यांनी दिले.
त्यामुळेच या दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्याची जी मोहीम आखली गेली त्या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले गेले. ते नाव आपल्या पराक्रमी सैनिकांनी सार्थ करून दाखवले. ज्या भगिनींच्या कपाळावरचे कुंकू दहशतवाद्यांनी पुसले होते त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी हे देशाच्या सरकारने उचललेले पहिले पाऊल आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
त्यामुळेच एरवी देखील भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा असलेला सिंदूर म्हणजेच शेंदूर हा पदार्थ अनन्यसाधारण महत्त्व मिळवून गेला आहे. यानिमित्ताने या सिंदुराचा नेमका इतिहास काय, तो कसा तयार होतो याची माहिती वाचकांना देण्यासाठी जे सहज सुचलं ते इथे मी सांगतो आहे. वाचकांना ते आवडेल अशी आशा आहे.
या निमित्ताने ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैनिकांना Ddbatmi@m2M चा मानाचा मुजरा.
अविनाश पाठक नागपूर....
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M
Comments
Post a Comment