श्री. भूषण गवई...
श्री. भूषण गवई...
अमरावतीचा सुपुत्र झाला.. सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश...
बालकृष्णन हे देशाचे पहिले दलित सरन्यायाधीश बनले होते. त्यांनी सरन्यायाधीश म्हणून २०१० पर्यंत काम पाहिले होते. त्यानंतर आता न्या. गवई यांनी दुसरे दलित आणि पहिले बौद्ध सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, अमरावती.
गवई परिवाराचा व आमचा पारिवारिक संबंध आहे.मी फुले शाहू आंबेडकर चळवळीत असल्यामुळे व त्यांच्या महाविद्यालयामध्ये माझी बहीण निर्मला काठोळे ही मराठीची प्राध्यापिका असल्यामुळे हे संबंध अजून घट्ट झालेत.मी मिशन आयएएस ही चळवळ राबवितो. मा.लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ.कमलताई गवई यांना ही मिशन आयएएस चळवळ आवडल्यामुळे त्या आमच्या बरोबर ह्या चळवळीत सहभागी झाल्या आहेत. त्या मला त्यांचा मानसपुत्र मानतात.मोठा मुलगा मानतात.
दिनांक १० व ११ मे २०२५ रोजी त्या आमच्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत आल्या आणि या दोन दिवसात त्यांनी भूषण गवई यांच्या खूप आठवणी आमच्या आय ए एस करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितल्या.
न्यायमूर्ती श्री भूषण गवई हे खरोखरच आदर्श व्यक्तिमत्व आहे.आज आम्हाला त्याचा अभिमान आहे.
अमरावती हा भाग्यवान जिल्हा आहे. या जिल्ह्यातील श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या भारत देशाच्या राष्ट्रपती झाल्या.आणि आज दिनांक १४ मे रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ ग्रहण केलेली आहे. एका जिल्ह्याला हे दोन बहुमान मिळणे हे आम्हाला भूषणावह आहे.
भूषण सर हे सर्व साधारण अशा मराठी शाळेत शिकले. अमरावती शहरात असलेल्या फ्रेझरपुरा या नगरातील गजेघाट हा महानगर पालिकेच्या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. एक मराठी माध्यमात महा नगर पालिकेच्या शाळेत शिकलेला मुलगा आज देशाच्या सर न्यायाधीश पदांवर आरुढ झाले आहेत ही प्रेरणादायी गोष्ट आहे.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे*
संचालक मिशन आयएएस अमरावती
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M

Comments
Post a Comment