ग्राहक राजा जागा हो! बँकाबद्दल ग्राहकाचे अधिकार
ग्राहक राजा जागा हो!
बँकाबद्दल ग्राहकाचे अधिकार
बॅंका आपल्या दैनंदिन आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. सर्व बॅंकांनी त्यांच्या ग्राहकांना उत्तम सेवा द्यावी* *याकरीता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने काही नियम केले आहेत. बॅंक ग्राहकांनी हे नियम समजावून घेऊन आपले ग्राहक हक्क अबाधित ठेवावेत.
या संदर्भातील काही महत्वाचे नियम पुढीलप्रमाणे* ----
*१) बॅंकेच्या खातेदारांना बॅंकेच्या एटीएम मधूनच पैसे काढण्याचे बंधन घालता येणार नाही. त्यांना एटीएम मधून किंवा बॅंकेच्या काउंटर वरुन कोणत्याही मार्गाने पैसे काढता येतील*.
*२) बॅंकेमध्ये चेक भरणाऱ्या खातेदारांना ड्रोप बाॅक्स मध्येच चेक जमा करण्याची सक्ती करता येणार नाही , उलट ड्राॅप बाॅक्सवर " खातेदारांना काउंटरवर चेक जमा करून पोच घेण्याची सुविधा उपलब्ध आहे" असा बोर्ड लाऊन अशी सेवा देणे बंधनकारक आहे*.
*३) ग्राहकांना चेकबुक कुरीअरनेच स्वीकारणे बंधनकारक करता येणार नाही, त्यांना बॅंकेत येऊन चेकबुक स्वीकारता येईल ( काही बॅंका " कुरीअरवाल्याने चेकबुक गहाळ केल्यास जबाबदारी बॅंकेची असणार नाही" असे लिहित असल्याने हा नियम केला गेला आहे)*
*४) बॅंकेमध्ये लाॅकर हवा असेल तर अवाच्या सव्वा मुदत ठेव ठेवण्याचे बंधन घालता येणार नाही , फक्त तीन वर्षांचे लाॅकर भाडे एवढ्या रकमेची मुदत ठेव ठेवण्याचे बंधन घालता येईल . लाॅकर भाडे कराराची प्रत ग्राहकाला मिळणे बंधनकारक आहे. बॅंकेत लाॅकर मिळण्यासाठी प्रतिक्षा यादी असेल तर ती पारदर्शकपणे ठेवणे व प्रतीक्षा यादीतील प्रत्येक ग्राहकाला त्याचा प्रतिक्षा नंबर कळवणे आवश्यक आहे*.
*५) एटीएम मधून पैसे काढताना पैसे न मिळणे , कमी मिळणे अशी कोणतीही तक्रार ग्राहकाने केली तर तक्रार दाखल झाल्यापासून कामकाजाच्या सात दिवसांत तक्रारीचे निराकरण केले जाणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील प्रत्येक उशिराच्या दिवसासाठी बॅंकेने खातेदाराला १०० रुपये प्रतिदिन एवढी नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र यासाठी घटना घडल्यापासून तीस दिवसांत ग्राहकाने तक्रार करणे आवश्यक आहे*.
*६) बॅंक एटीएम विषयीची तक्रार दाखल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नावे , पत्ते , फोन नंबर, एटीएम आयडी या गोष्टी ठळकपणे एटीएम मध्ये सूचना फलकावर लिहिल्या पाहिजेत*.
*७) बचत खात्यात कमीत कमी किती रक्कम शिल्लक ठेवली पाहिजे व न ठेवल्यास ग्राहकाला काय दंड पडेल यासंबंधीची माहिती वेळोवेळी बॅंकेने खातेदाराला दिली पाहिजे. खातेदाराच्या खात्यातील रक्कम किमान आवश्यक पातळीच्या खाली गेली तर बॅंकेने खातेदाराला तत्काळ एसएमएस/ ई मेल/ पत्राने तसे कळवले पाहिजे व एक महिन्याच्या मुदतीत खात्यातील रक्कम किमान आवश्यक रकमेच्या पातळीला आणण्यास सांगितले पाहिजे. त्यानंतरही खातेदाराने किमान आवश्यक रकमेच्या पातळीला खात्यातील शिल्लक न आणल्यास त्याला खात्यातील किमान आवश्यक शिल्लक व प्रत्यक्ष शिल्लक यातील फरकाच्या रकमेवर फक्त दंड लावता येईल (ठराविक दंड नाही) व तसे त्याला कळवावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत या दंडामुळे खात्यातील रक्कम शून्याखाली जाणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ नियमाप्रमाणे खात्यात किमान शिल्लक रक्कम एक हजार रुपये असणे आवश्यक आहे व एखाद्याच्या खात्यात ९९९ रुपये असतील तर त्याला दंड १०००-९९९ = १ रुपयाच्या प्रमाणात (१०/२० पैसै) लावता येईल, ठोक ४००/५०० रुपये दंड लावता येणार नाही*.
*८) बॅंकांना उठसूठ के.वाय.सी (KYC ) अद्ययावत करण्यासाठी कागदपत्र मागता येणार नाहीत. सर्वसामान्य खातेदाराला १० वर्षांतून एकदाच के.वाय.सी अद्ययावत करण्यासाठी विचारणा करता येईल आणि जर ग्राहकाच्या माहितीत काहीच बदल नसेल तर त्याने कोणतीही कागदपत्रे न देता फक्त ई मेल वरुन KYC माहितीत काहीच बदल नाही असे कळवले तरी चालेल*.
*९) बॅंकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले फोटो सहितचे ओळखपत्र सहज दिसेल अशा पद्धतीने जवळ बाळगले पाहिजे*.
*१०) बॅंकेच्या प्रत्येक शाखेत तक्रार निवारण पद्धतीची माहिती प्रदर्शित असली पाहिजे. ज्यामध्ये तक्रार पुस्तक , तक्रार मिळाल्याची पोच देण्याची व्यवस्था, तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक, बॅंकिंग लोकपालाचे नांव व संपर्क यांची माहिती ग्राहकांकरीता ठळकपणे उपलब्ध असली पाहिजे*.
*११) सर्व बॅंकांनी ग्राहक नुकसान भरपाई पाॅलिसी जाहीर केली पाहिजे , ज्यामध्ये ग्राहकांच्या खात्यातून चुकीने रक्कम कमी करणे , चेक कलेक्शन मधील प्रमाणाबाहेर उशीर , डुप्लिकेट ड्राफ्ट देण्यामधील उशीर , ज्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होते अशा बॅंकेकडून घडलेल्या कृती या गोष्टींबद्दल बॅंक देऊ लागणारी नुकसान भरपाई किती आहे हे जाहीर करणे आवश्यक आहे*.
*१२) प्रत्येक बॅंकेच्या ब्रॅंचमध्ये कस्टमर सर्व्हिस कमिटी स्थापन केली पाहिजे ज्यामध्ये ग्राहक प्रतिनिधी विशेषतः ज्येष्ठ नागरिक यांना स्थान दिले पाहिजे. महिन्यातून एकदा तरी या कमिटीची बैठक घेऊन आलेल्या सेवा विषयक तक्रारी व सूचना यावर चर्चा करून मार्ग काढला गेला पाहिजे*.
*१३) खातेदाराचा चेक बाऊन्स झाला तर त्याला तो २४ तासात कारण देऊन परत पाठवला पाहिजे*.
*१४) बॅंकेच्या शाखा तसेच एटीएम मध्ये व्हील चेअर वरील माणसाला प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प असणे आवश्यक आहे*.
*१५) बचत खाते किंवा करंट अकाऊंट यामध्ये सलग दोन वर्षे एकही व्यवहार नसेल तरच ते खाते डाॅर्मंट (dormant) म्हणून घोषित करता येईल*.
*१६) ग्राहकाकडून बॅंकेत बनावट नोट भरली गेली तर बॅंक त्याच्या बदली खरी नोट देणार नाही मात्र ग्राहकाला त्याची पावती दिली जाईल व त्या नोटेवर बनावट नोट असा शिक्का बॅंक मारेल जेणे करून संबंधित नोट परत चलनात येऊ नये*.
*१७ ) सर्व बॅंकांच्या सर्व शाखांमध्ये कोणत्याही नागरीकाला नोटा व नाणी यासंबंधी खालील सुविधा देणे बंधनकारक आहे*.
अ) सर्व प्रकारच्या नवीन नोटा व नाणी ग्राहक मागेल तशा प्रकारे देणे
ब) सर्व प्रकारच्या खराब झालेल्या , फाटलेल्या , चिकटवलेल्या नोटा बदलून देणे.
*१८) बॅंक ग्राहकांचे तक्रारींची दखल बॅंकेने घेतली नाही तर ग्राहकांना दिलासा मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केंद्रीभूत तक्रार निवारण यंत्रणा निर्माण केली आहे ज्याचे नांव आहे बॅंकींग लोकपाल. बॅंकेकडे तक्रार दाखल केल्यानंतर ३० दिवसांत त्याचे समाधानकारक निराकरण झाले नाही तर ग्राहकाला बॅंकींग लोकपालाकडे https://cms.rbi.org.in या संकेतस्थळावर पुढील एक वर्षांत तक्रार दाखल करता येते. बॅंकींग लोकपाल प्रथम समझोत्याने तक्रार निवारण करण्याचा प्रयत्न करतो पण तसं झालं नाही तर तो तक्रारीवर आपला निर्णय देतो. हा निर्णय तक्रारदार किंवा बॅंक यांना पटला नाही तर त्यांना पुढील तीस दिवसांत अपीलात जाण्याची संधी मिळते*.
*१९) सर्व बॅंकांच्या शाखांमध्ये बॅंकींग लोकपाल संबंधी संपूर्ण माहिती प्रदर्शित करणे अनिवार्य आहे*.
*२०) एखादे फ्राॅड ट्रान्झॅक्शन झाले असेल आणि ते ग्राहकाने तीन कामकाजाच्या दिवसांत बॅंकेच्या निदर्शनास आणून दिले तर झालेल्या नुकसानीची जबाबदारी पूर्णपणे बॅंकेची असेल*. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे ६/०७/२०१७ चे परीपत्रक अत्यंत महत्त्वाचे आहे.
जनहितार्थ .....
दीपक देशपांडे, अध्यक्ष
नागपूर विदर्भ प्रांत
जागृत ग्राहक राजा संघटना.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M

Comments
Post a Comment