यावर्षी लवकरच लागणार दहावी बारावीचा निकाल.
ब्रेकिंग न्यूज
यावर्षी लवकरच लागणार दहावी बारावीचा निकाल.
आजच तारखा जाहीर?
बारावीचा६तारखेला तर
दहावीचा १५मे ला.
दीपक देशपांडे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी – बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या निकालाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. १०वी-१२ वीच्या विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे. मे महिन्यात या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे त्यापैकी बारावीचा निकाल ६मे रोजी तर दहावीचा निकाल १५मे रोजी अशी विश्वासनीय सुत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली. या निकालाच्या तारखा ६आणि१५मे असणार आहेत.बोर्डाकडून सांगण्यात आले. मात्र यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांचीही धडधड वाढली आहे.
फेब्रुवारीत सुरू झाली परीक्षा
यावर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत १२ वीची परीक्षा झाली होती. यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी १२वीची परीक्षा दिली. ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. तर इयत्ता १० वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाली ती १७ मार्चपर्यंत होती.
विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मे महिना संपायच्या आतच दोन्ही १०वी , १२वी चे निकाल लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळेल.
लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला वेळेवर सामोरे जाण्यास मदत होणार आहे. यापूर्वी, निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी कमी वेळ मिळत असे. मात्र यंदा तसे होणार नाही,असा आजतरी विश्वास वाटतो आहे.ऐनवेळी काही गडबड झाली नाही तर पहिल्या आठवड्यात बारावी आणि दुसऱ्या आठवड्यात दहावी चार निकाल अपेक्षित आहे.
कुठे पाहता येणार निकाल ?
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment