आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 🌹🌹 ‼वसुधैव कुटुंबकम्‼
आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 🌹🌹
‼वसुधैव कुटुंबकम्‼
जग खरच जवळ आलेय. पूर्वी एका गावातून दुसऱ्या गावाला जेवढा वेळ लागायचा तेवढ्या वेळात लोक परदेशात जातात. भौगोलिक सीमांचा अडसर कमी होत आहे.
जगभरातील बहुतांशी लोक विवेकी झालेत. त्यामुळे जात.. पंथ.. धर्म.. भाषा.. अहंकारी अस्मिता या शृंखला पण गळून पडत आहेत. परदेशगमनातील अडचणी कमी होत आहेत. एकमेकांच्या धर्माचा आदर करत शांततेत जगता येते हे अनेक देश सिद्ध करत आहेत. जिथे शांतता असेल त्या देशात लोक पर्यटनाला जातात. लाखो लोक नोकरी.. व्यवसाय करुन सुखाने जगत आहेत. जणू जग म्हणजे एक कुटुंब झालेय.
भारतीय संस्कृती तर 'वसुधैव कुटुंबकम्' मानणारी. संत ज्ञानोबा हे 'विश्वच माझे घर' मानतात तर विनोबा 'सब भूमी गोपाल की' मानायचे. विशिष्ट नात्यातील व्यक्तींचे कुटुंब.. कुटुंबाचा समाज आणि मग समाजांच्या भूभागाचे राज्य.. त्यानंतर देश निर्माण होत पूढे जग तयार होते.
जगाचा प्रारंभ हा कुटुंबापासून होतो. यामुळेच जगातील सगळ्याच कुटुंबांच्या गरजा.. भेडसावणाऱ्या समस्याही समसमान आहेत. शिक्षण.. नोकरी.. व्यवसाय.. आहार.. आरोग्य.. प्रगत तंत्रज्ञानाने होणारे फायदे आणि संभाव्य जिवघेणे धोके.. पर्यावरण बदल.. समाजातील वाढती गुन्हेगारी.. दहशतवाद याचे परिणाम अशा सर्वच समस्यांचा जगातील सर्वच कुटुंब समसमान सामना करत आहेत. जगाची लोकसंख्या वाढतेय पण कुटुंबातील कमीकमी होत आहे. हा पण सामाजिक असुरक्षिततेचा गंभीर प्रश्न झालाय.
या कुटुंबातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ (ज्याचे १९३ देश सदस्य आहेत) दरवर्षी १५ मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन' साजरा करतो. कुटुंब आर्थिक.. सामाजिक.. नैसर्गिक आपत्ती या समस्यांचा सामना करतात तेव्हा कुटुंबावर होणारे परिणाम तपासून जागरुकता निर्माण केली जाते. निराकरणासाठी उपाय योजले जातात.
जगातील सर्वच धर्माचे सार हे मानवी हित बघणारे आहे. सुखी संपन्न, आनंदी मानव हे त्याचे उद्दिष्ट आहे. मग आजचा कुटुंब दिन सर्वच संस्कृतीच्या राष्ट्रात एकता.. बंधूता.. जगातील युद्ध टाळून हिंसाचार टाळून शांतता निर्माण करण्यासाठी कार्य करणारा आहे. पण जागतिक कुटुंब आनंदी रहावी अशी वर्तणुक जगातील सगळेच देश करतील अशी अपेक्षा करुया.
या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची थीम आहे “शाश्वत विकासासाठी कुटुंबाभिमुख धोरणे: सामाजिक विकासासाठी दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या दिशेने.”
भारतीय संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धती.. कुटुंब सदस्यांचा एकमेकाप्रती जिव्हाळा.. प्रेम.. त्यागवृत्ती हा जगासाठी कुतुहलाचा विषय आहे. प्रत्येक 'जीव' हा 'शिव' आहे हे येथील कुटुंबावर धर्म संस्कार आहेत. 'मातृदेवो पितृदेवो भव' मानत मुले आईवडीलांसाठी श्रावण बाळ होत सेवा करतात.
प्रत्यक्ष परमेश्वर.. पांडुरंग जरी या आईवडिलांच्या सेवेच्या आड आला तर त्यालाही वीटेवर उभे करणाऱ्या पुंडलिकाचा आदर्श देशवासियांसमोर आहे. इथे सदैव आईवडीलांना सुखी ठेव ही प्रार्थना केली जाते. असेच हजारो वर्षे पिढ्यानपिढ्या सुरू आहे म्हणूनच भारतीय कुटुंब व्यवस्था जगात आदर्श ठरली आहे.
कितीही संकट आली तरीही आमची कुटुंब व्यवस्था दिवसागणिक आणखी बळकट होवो.. परस्परातील प्रेमभाव वृद्धींगत होवो हीच मनोकामना. तेव्हा सर्वांना या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. !!
कौटुंबिक सौख्य लाभलेली ,आनंदी पहाट.
*सुखी ठेव देवा त्यांना*
*सुखी ठेव देवा*
*आई करते माया रे*
*बाबा देती छाया रे*
*आजोबांनी उपदेशाचा मंत्र*
*आम्हाला द्यावा, देवा*
*आम्ही होऊ श्रावण बाळ*
*मायपित्यांचा करू सांभाळ*
*कावड घेऊन चालत जाऊ*
*पुण्याईच्या गावा, देवा*
*पुंडलिकाचे रूप धरू*
*मायपित्यांचे पाय चुरू*
*वीट फेकुनी तुला थांबवू*
*परि न सोडू सेवा, देवा*
*१५.०५.२०२५*
संकलन -अभय बक्षी नागपूर
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M

Comments
Post a Comment