आनंदी पहाट ,जिवाभावाच्या मैत्रीची
आनंदी पहाट ,जिवाभावाच्या मैत्रीची
संकलन -अभय बक्षी.
जीवनात सगळीच नाती कशी भेटावीत हे परमेश्वर ठरवतो. 'शेजारी' हे पण जीवनातील महत्त्वाचे नाते. हे शेजारी कसे भेटावेत हे पण तो परमेश्वरच ठरवतो. जगात करोडो लोक राहतात. त्यामधील जे चांगले शेजारी भेटतात ते सुख-दुःखाच्या प्रसंगी नातेवाईकापेक्षाही जास्त उपयोगी पडतात. अशावेळी मानवता हा एकच धर्म सर्वांचा असतो. असे जुळणारे ऋणानुबंध देशातील एकात्मता निर्माण करतात.*
*स्वातंत्र्यपूर्व काळात लोक पिढ्यानपिढ्या एकाच गावात राहायचे. ते एकमेकांच्या सुखदुःखाचे साथीदार असायचे.. त्यांची मैत्री जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यन्त असायची. या शेजाऱ्यांच्या मैत्रीत कुणी कितीही वितुष्ट आणायचा प्रयत्न केला तरीही ते अपयशी ठरायचे. स्वातंत्र्यपूर्व काळातील (१९४१) 'शेजारी' या अजरामर चित्रपटाने हेच अधोरेखीत केलेय.*
*मैत्री हा तर मानवी गुण. या मैत्रीत कोणताही स्वार्थ नसतो. असते निरपेक्ष प्रेम.. सहानुभूती.. आपुलकी. ही मैत्री अगदी मुक्या जीवांशी पण जुळते. असेच नाते शेतकऱ्यांचेही प्राण्यांशी असते. देशभरातील जनतेला निरामय आरोग्यदायी जे काही सकस अन्नधान्य.. फळे.. भाजीपाला मिळण्यासाठी शेतकरी राजाच्या कष्टाला मोलाची साथ लाभते ती लाडक्या बैलांची.*
*शेतकऱ्यांची आपल्या गोधनाशी जिवापाड मैत्री असते. शेतात स्वतःबरोबर तेवढेच कष्ट करणाऱ्या बैलांबरोबर त्यांच्या जीवनातील मोठा काळ व्यतीत होतो. तो आपली सुखदुःखही.. आनंद त्याच्याबरोबर वाटतो. याच बैलांच्या कष्टाने मळ्यात माणिक मोत्याचे पीक येते. शेतात प्रकटणाऱ्या या वैभवाची सर जगातील कोणत्याही श्रीमंतीला नाही.*
*बैलाच्या कष्टाने प्राप्त मानवी आरोग्यासाठी श्रेष्ठ असे अत्यंत शुद्ध अन्नधान्य प्राप्त होते. शेतकऱ्यांच्याही घराचे मंगल होते. घरात आनंदी गोकुळ तयार होते. त्या घरातील व्यक्तींमध्ये प्रेम असते. सर्वत्र सुखच सुख आढळते. ही सारी कृपा मनुष्याच्या जीवाला जीव लावणाऱ्या.. कष्ट करणाऱ्या.. मानवाच्या आनंदाने स्वतः आनंदी होणाऱ्या सर्जा राजाचीच.*
*'शेजारी' चित्रपट अनेक गोष्टीने लोकप्रिय ठरला. यामध्ये संगीताचा मोठा वाटा आहे. "लखलख चंदेरी..", "सारे प्रवासी घडीचे..", "हासत वसंत वनी..", "राधिका चतुर बोले" अशी अजरामर गाणी १९४१ च्या या चित्रपटातील आहेत यावर विश्वास बसत नाही.*
*जिवाचं मैतर तुम्ही माझ्या*
*चल चल सर्जा, चल राजा रे*
*जिवाचं मैतर तुम्ही माझ्या*
*बाग मळ्यांची दाटी रे*
*पिकती माणिकमोती रे*
*लवलव करिते हिरवळ रे*
*फुलली नाजूक मखमल रे*
*जिवाचं मैतर तुम्ही माझ्या*
*दौलत ही न्यारी*
*फुलवित शेतकरी*
*त्यास उणे सारे*
*दुनियेचे वैभव रे*
*चल चल सर्जा, चल राजा रे*
*जिवाचं मैतर तुम्ही माझ्या*
*मंगल घर अपुलं*
*गोकूळ गजबजलं*
*प्रीत इथे झुळझुळते*
*सूख-ममतेचं माहेर रे*
*जिवाचं मैतर तुम्ही माझ्या*
*चल चल सर्जा चल राजा रे*
*जिवाचं मैतर तुम्ही माझ्या*
०५.०५.२०२५
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment