बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी:- तालुका कृषी अधिकारी मूल व जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना, मूल.

बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी:- तालुका कृषी अधिकारी मूल व जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना, मूल.

 मूल : न्यूज ब्युरो 

 चालू वर्षातील २०२५- २६ खरीप पिकांसाठी तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांनी खात, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी शासन मान्यता कृषी निविष्ठाचा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

बोगस व बेकायदेशीर बियाणे म्हणजे काय ज्या बियाण्याच्या उत्पादनास व विक्रीस शासनाची परवानगी नसते, बियाण्याच्या उत्पन्नासंबंधी मनघडंत व खोटे दावे करून आमीष दाखविण्यात येते, बियाण्याच्या व्यवहारांमध्ये शासनमान्य दराचे अधिकृत बिल शेतकऱ्यास दिले जात नाही, बियाण्याच्या पाकिटावर बियाण्याच्या गुणवत्तेचा तपशील व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो, अनाधिकृत बियाणे वापरामुळे जर शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाई ची हमी शासन व ग्राहक मंच सुद्धा घेऊ शकत नाही असे बियाणे बोगस व कायदेशीर असते. शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. यासाठी पक्क्या बिलाचाच आग्रह धरावा. विक्रेता पक्के बिल देण्यास नकार देत असल्यास किंवा इतर कुठलीही शंका तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी, किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून तक्रार नोंदवावी. बिलावर खरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवतेचा संपूर्ण तपशील नोंदविलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे पॉकीट सीलचंद, मोहरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी. बियाण्याच्या उगवणक्षमतेचा अंतिम मुदतीचा दिनांक पाहूनच पॉकीट किंवा  बॅग खरेदी करावी. एमआरपी पेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्यास त्वरित कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी. रासायनिक खत खरेदी करताना बॅग वरील एमआरपी किंमत बघूनच खरेदी करावी. जर कोणताही व्यक्ती अथवा संस्था बेकायदेशीर पद्धतीने बोगस बियाण्याची, खताची विक्री करताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध बियाणे नियंत्रण आदेश १९८३ रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल. अशी बोगस बियाणे व खते विक्रीची एबाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांनी शेतकरी बंधुंना आवाहन केले आहे.

जागृत ग्राहक राजा संघटना या बाबतीत वर्षे भर आपल्या ग्राहक जागृती अभियानातून ही बाब शेतकऱ्यांना पटवून देत असते परंतु नवीन वाणाचे बियाणे आले असल्याचे व उत्पादन क्षमता अधिक असल्याचे सांगितले जाते परिणामी शेतकरी बांधव या भुलथापांना बळी पडून असे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रवृत्त होतात आणि नंतर मग हे बियाणे उगवले नाही किंवा उत्पादन कमी आले की ओरडतात असे प्रकार दरवर्षी घडत असतात म्हणून कोणतेही नवीन वाणाचे बियाणे खरेदी करताना संपूर्ण माहिती घेऊन खात्री पटवून व पक्के बिल घेऊनच बियाणे खरेदी करावेत आणि पेरणीनंतर बियाण्यांचे मुठभर नमुने (सॅम्पल) , बिलाची पावती,खरेदी केलेली पिशवी त्यावरील टॅगसह पीक हातात येईस्तोवर जपून ठेवणे आवश्यक आहे ,या साऱ्या गोष्टी असतील तरच भविष्यात काही अघटीत घडले आणि दाद मागायची वेळ आली तर न्याय मागता येतो,यांची जाणीव बाळगावी असे ही आवाहन जागृत ग्राहक राजा तालुका मूल या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.