घरकुलासाठी आता मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार, महसूलमंत्र्यांचे निर्देश, तक्रार आल्यास कारवाई.

 घरकुलासाठी आता मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार, महसूलमंत्र्यांचे निर्देश, तक्रार आल्यास कारवाई



दीपक देशपांडे.

घरकुल बांधकामासाठी आता मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.

३० लाख घरकुल उभारण्यासाठी महत्त्वाचे आदेश

घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना जवळच्या वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी ३० लाख घरकुले दिली आहेत. या घरकुलांना मोफत वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारलेले आहे. मात्र, या घरकुलांना वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांची मदत घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व घरकुल लाभार्थींना घरपोच वाळू रॉयल्टीची पावती पोहच करणे आवश्यक आहे. त्याची नोंदही ठेवण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी  पालकमंत्र्यांसोबत तर तहसिलदारांनी आमदारांसोबत बैठक घेऊन त्यांच्या मागणीनुसार वाळूची निर्गती करणे आवश्यक आहे. 

अधिकाऱ्यांनी कामात कुठेही चूक करता कामा नये

अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कुठेही चूक करता कामा नये असेही सांगण्यात आले आहे. महसूल संदर्भात यावेळी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात एकही तक्रार येता कामा नये. तक्रार आली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांसोबत तर तहसिलदारांनी आमदारांसोबत बैठक घेऊन त्यांच्या मागणीनुसार वाळूची निर्गती करणे आवश्यक आहे.  वाळू निर्गती धोरणाच्या अंमलबजावणीबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात वित्त व नियोजन, मदत पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जैस्वाल, आमदार आशिष देशमुख, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.