तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या ४ महिलांचा २ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू तर एका बांधलेल्या उंटाचाही फडशा.

 महाब्रेकिंग:-

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या ४ महिलांचा २ठिकाणी  वाघाच्या हल्ल्यात मृत्यू तर एका बांधलेल्या उंटाचाही फडशा.



मूल,सिंदेवाही:- दीपक देशपांडे.

वाघाच्या हल्ल्यात दोन दिवसांत चार महिलांचा बळी!एक गंभीर जखमी.

 काल परवा सिंदेवाही परिसरात तीन तर  मूल तालुक्यात तेंदूपत्ता संकलन करताना आणखी एका महिलेचा मृत्यू. रात्री झाडाला बांधलेल्या उंटाचाही वाघाने पाडला फडशा.

चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास सुरुवात झाली असून जंगलालगतच्या गावातील नागरिक आपली रोजी रोटी भागविण्यासाठी वाघाची भीती असतांना देखील तेंदुपत्ता संकलनासाठी जात असतात. काल शनिवारी  सिंदेवाही तालुक्यातील मेंढा गावातील महिला जंगलात  गेल्या असताना सिंदेवाही तालुक्यात ३ महिलांचा वाघाने बळी घेतला होता. तर एका महिलेला  गंभीर जखमी केले होते, माहिती  मिळताच वनविभागाच्या वतीने पंचनामा करून चौकशी सुरू केली होती तर रात्री  मूल तालुक्यातील कोसंबी येथे झाडाला बांधलेल्या उंटाचाही फडशा पाडला याबाबत  माहिती कोसंबी येथील पोलिस पाटील यांनी प्रशासनाला  माहिती दिली व चौकशी करण्यात आली तर आज सकाळी  ११ मे २०२५ रोजी मूल तालुक्यातील नागाळा येथील महिला विमल बुधाजी शेंडे (६५) ही सकाळी ७ वाजता तेंदुपत्ता तोडण्यासाठी चिचपल्ली वन परिक्षेत्रातील नियत क्षेत्र पिंपळखुट, उपक्षेत्र महादवाडी कक्ष क्रमांक ५३७ मध्ये तेंदू पत्ता तोडण्यासाठी गेली असता जंगलात झुडुपांमध्ये असलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करुन तिला जागीच ठार केले.

घटनेची माहिती प्राप्त होताच चिचपल्ली (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, प्राणीमित्र व पर्यावरण मित्र उमेशसिंह झिरे तात्काळ घटनास्थळाला आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन भेट देऊन मोका पंचनामा करुन घेतला. महिलेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मूल येथे शव विच्छेदनाकरीता पाठविण्यात आला होता आणि चौकशी सुरू केली आहे.

यादरम्यान मूल तालुक्यातील मौजा कोसंबी येथे राजस्थान मधून आलेल्या धनगरांच्या कळपातील झाडाला बांधलेल्या एका  उंटाचाही वाघाने रात्री बळी घेतल्याचे वृत्त हाती आले आहे.

या तीनही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या असून सर्वसामान्य माणसाला भिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांत चार महिलांचा आणि एका उंटाच्या फडशा पाडणाऱ्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत आणि याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा जनक्षोभ वाढिस लागला असून शासनाने वनविभागाच्या वतीने गावाजवळील जंगलाला कुंपण करण्याची व  वाढलेल्या वाघांची संख्या लक्षात घेता तातडीने वाघाच्या बंदोबस्ताची मागणी केली असून आता थातूरमातूर चौकशी आणि तशीच कारवाई करुन शेतकरी व कामगार यांच्या जिवीताशी खेळण्याचा प्रकार थांबविला नाही तर नागरिक आवश्यक तो बंदोबस्त करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतील असा इशाराही यानिमित्ताने परिसरातील जनतेच्या वतीने वनविभागाला व शासनाला देण्यात आला आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.