मूल तालुक्यातील गुणवंत. पियुष पाल.

मूल तालुक्यातील गुणवंत. 

पियुष पाल.













 मूल तालुक्यातील नवेगाव भुजला येथील ग्रामीण भागात शिक्षण घेणारा विद्यार्थी पाल याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत  मोठे यश मिळवले आहे.

हे यश मिळवून त्याने आपल्या गावाचे व मूल तालुक्याचे नाव उंचावले आहे. मूल तालुक्यातील नवेगाव भुजला येथील पंढरीनाथ पाल  चे  शिक्षक आहेत यांचा मुलगा पियुष पाल याची एमपीएसी परीक्षेत अभियांत्रिकी सेवेत १३९ व्या क्रमांकावर  निवड झाली आहे.

पियुष चा शैक्षणिक प्रवास वडील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्याने ग्रामीण  भागात जिल्हा परिषद शाळेतून सुरू झाला. अशाही स्थितीत मेहनतीने त्याने हे यश मिळवले आहे , आपल्या यशाचे श्रेय त्याच्या अथक परिश्रमाला, जिद्दीला आणि चिकाटीला जाते. या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

तो एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांना एवढेच सांगू इच्छितो की, आज कोणत्याही प्रकारचे क्लास न लावताही केवळ इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो. आपल्या ग्रामीण भागातील मुलांनीही मोबाइल, लॅपटॉपचा योग्य वापर केला, तर कमी खर्चात गरीब मुलांनाही एमपीएससी पास होणे अशक्य नाही .

करिअरचे नवे दालन…

मेहनत, सातत्य व सुनियोजित प्रयत्नांतून या परीक्षेत यश मिळवता येते. वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. पण त्याचबरोबर एमपीएससी परीक्षा दिली तर करिअरचे नवे दालन उघडू शकते, असे पियुष पाल यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत वार्तालाप करताना स्पष्ट केले.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M




Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.