महाराष्ट्र दिनाच्या अभिमानाची, जागतिक कामगार दिनाची गाथा...

महाराष्ट्र दिनाच्या अभिमानाची, जागतिक कामगार दिनाची गाथा...


संकलन:-अभय बक्षी, नागपूर.

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलीदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली.

        १ मे. १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला यश प्रात होत महाराष्ट्र राज्याचे स्वप्न पूर्ण झाले. भाषावार प्रांत रचनेची मागणी प्रथम लोकमान्य टिळकांनी केली. पूढे महात्मा गांधीनी ठराव संमत केला. इंग्रजांनी प्रशासकीय व्यवहारासाठी केलेली प्रांत रचना अन्यायी होती. इंग्रजी भाषा लादली गेल्याने जनतेचे हाल होत होते.

        संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा पाया १९३८ मध्ये वऱ्हाडात रचला गेला. हा प्रदेश मध्य प्रांतात (सी.पी.अँड बेरार) असल्याने लोकांचे हाल होत होते. १९४६ ला ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखालील मराठी साहित्य संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन होत संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याचे अभ्यासपूर्ण समर्थन केले होते.

        भाषावार प्रांत रचनेने अस्मिता उफाळून येत उपराष्ट्रवाद निर्माण होईल या काहींच्या शंकेला मोडीस काढत महाराष्ट्राने भारताच्या एकात्मतेत.. सर्वांगीण विकासात फार मोठे योगदान आजवर दिलेय.. देत आहे.

        महाराष्ट्र ही संतांची भूमी. ज्याला ऋग्वेदात राष्ट्र संबोधलेय. महाराष्ट्रातील स्थळांचा उल्लेख रामायण.. महाभारतात आहे. मौर्यानंतर इथे सातवाहन.. चालुक्य.. वाकाटक देवगीरीचे यादव इ. ची सत्ता होती. शालिवाहनाचे शके आजही महाराष्ट्रीय पंचांगात आहे. मराठी ही शालिवाहन काळापासूनची राजभाषा.

        १३ व्या शतकानंतर आलेल्या मोगल आक्रमणाविरुद्ध लढा देत भारतात सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य स्थापन केले ते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्याचे रक्षण केले ते छत्रपती संभाजी राजे यांनी, तर या मोगलांना हरवून दिल्ली काबीज करुन आजच्या देशाच्या सीमेबाहेर मराठ्यांची सत्ता नेली ती पेशव्यांनी.

        ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे बंड उभारले ते वासुदेव बळवंत फडकेंनी.. क्रांतीसिंह नाना पाटील यांनी. चाफेकर बंधूं.. राजगुरूसह कित्येक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य आंदोलनात प्राणदान दिले. स्वा. सावरकराच्या दोन जन्मठेपेच्या यातनामय काळ्यापाण्याच्या शिक्षेने स्वातंत्र्य आंदोलन आणखी पेटले.

        महाराष्ट्र म्हणजे नररत्नाची खाण. भारतीय स्वातंत्र्याचा मंत्र देत देशव्यापी नेतृत्व केले ते लोकमान्य टिळकांनी. महात्मा गांधीचे गुरु गोपाळकृष्ण गोखले इथलेच. महात्मा गांधीना सर्वाधिक कार्यकर्ते दिले ते महाराष्ट्राने. भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे.. स्त्री शिक्षणासाठी झटणारे सुधारक आगरकर.. महात्मा फुले. सावित्रीबाई फुले.. समतेची राज्यव्यवस्था निर्माण करणारे शाहू महाराज असो वा स्वातंत्र्यात आपले राज्य सहभागी करणारे औंधचे राजे इथलेच. देशाला घटना देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही भूमी.

        कुटुंबानेही नाकारलेल्यांना मायेची सावली देणारे बाबा आमटे आणि परिवार.. सिंधुताई सपकाळ या महाराष्ट्राच्याच. देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील दिल्या या महाराष्ट्राने. एखादा राज्याचा विक्रम ठरावा असे ९ भारतरत्न हे महाराष्ट्राचे. अर्थ.. संरक्षण.. रेल्वे.. दळणवळण अशी महत्त्वाची खाती महाराष्ट्रातील नेत्यानी  सांभाळून दिशा दिलीय. महाराष्ट्रातील सैनिकांची मोठी फौज देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असते.

        देशाच्या राजकीय. सांस्कृतिक, आर्थिक सर्वागीण विकासात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. शंतनुराव किर्लोस्करानी कारखानदारीचा पाया रचला. चित्रपट क्षेत्राची मुहुर्तमेढ रचली ती दादासाहेब फाळकेनी. लावणी असो वा नाट्यसंगीत ही महाराष्ट्राची देणगी.

        *समतेचा आदर्श ठेवून "दुरीतांचे तिमिर जावो" म्हणत विश्वकल्याणाची प्रार्थना केली ती संत ज्ञानेश्वरांनी. देशाला भाविक केले ते संत तुकाराम.. नामदेव.. एकनाथ.. रामदास स्वामी अशा येथील अनेक संतांनी. मराठी संस्कृतीचा सण विशेषतः गणेशोत्सव तर आता जगभर संपन्न होतो.*

        जगातला हा सर्वात शांतताप्रिय सुरक्षित, सहिष्णु प्रदेश. देशात शिक्षण.. आरोग्य.. उद्योग.. कला.. क्रीडा अश्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर. चित्रपटसृष्टी असो वा उद्योग क्षेत्र.. देशभरातील लोकांना रोजगार मिळवून देतो तो आमचा महाराष्ट्र. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण म्हणजे मराठी. सर्वाना सामावून घेणारी महाराष्ट्राची संस्कृती. निसर्गसंपदेचे वरदान लाभलेला.. सुजलाम सुफलाम असलेला.. विवेकी जनतेचा असा आमचा महाराष्ट्र.

        लतादिदींचा.. सचिन.. सुनिलचा.. साहित्यिकांचा.. कलावंतांचा. नाट्य रसिकांचा.. सुज्ञ वाचकांचा.. जिज्ञासूंचा.. असा हा माझा महाराष्ट्र.

        अहोरात्र अंगमेहनत आणि बौद्धिक कष्ट उपसणाऱ्या कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारा हा आजचा दिवस.. जागतिक कामगार दिन, आणि आजच भारतात औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचाही स्थापना दिन हे आजच्या दिनाचे एक आगळे वैशिष्ट्य..

        जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा.. !!

  1️⃣

  *बहु असोत सुंदर संपन्न की महा*

  *प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा*


  *गगनभेदि गिरिविण अणु*

  *नच जिथे उणे*

  *आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे*

  *अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे*

  *तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?*

  *पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा*


  *प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे*

  *सदभावांचीच भव्य दिव्य आगरे*

  *रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे*

  *रमणईची कूस जिथे*

  *नृमणिखनि ठरे*

  *शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा*


  *नग्न खड्ग करि,*

  *उघडे बघुनि मावळे*

  *चतुरंग चमूचेही शौर्य मावळे*

  *दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले*

  *भासति शतगुणित जरी*

  *असति एकले*

  *यन्नामा परिसुनि रिपु*

  *शमितबल अहा*


  *विक्रम वैराग्य एक जागि नांदती*

  *जरिपटका भगवा झेंडाहि डोलती*

  *धर्म-राजकारण समवेत चालती*

  *शक्तियुक्ति एकवटुनि*

  *कार्य साधिती*

  *पसरे यत्कीर्ति अशी*

  *विस्मया वहा*


  *गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो*

  *स्फूर्ति दीप्ति धृतिहि*

  *जेथ अंतरी ठसो*

  *वचनि लेखनीहि मराठी*

  *गिरा दिसो*

  *सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो*

  *देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा*

  2️⃣

  *नसे राऊळी वा नसे मंदिरी*

  *जिथे राबती हात तेथे हरी !*

        🚩 *जय महाराष्ट्र* 🚩

 दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.