li.आनंदी°पहाट.il अयोध्येतील रामजन्माच्या सनई चौघड्यांची
🌻li.आनंदी°पहाट.il 🌻
अयोध्येतील रामजन्माच्या
सनई चौघड्यांची
श्रीराम नवरात्र
*आदौ राम तपोवनादि गमनं,*
*हत्वा मृगं कांचनम् ।*
*वैदीहीहरणं जटायुमरणं,*
*सुग्रीव संभाषणम् ॥*
*बालीनिर्दलनं समुद्रतरणं,*
*लंकापुरीदाहनम् ।*
*पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम्,*
*एतद्धि रामायणम् ॥*
*.... एकश्लोकी रामायणं*
आज चैत्र शु. नवमी. "राम जन्मला गं सखी, राम जन्मला".. हे जादुई शब्द ऐकून लोक त्रेतायुगात प्रवेश करतात. भारतवर्षाचा हर्षोल्हासाचा.. आनंदाचा.. मनाला उभारी देणारा हा दिवस. अयोध्याच नाही तर भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा ज्या ज्या देशात आहेत तिथे तिथे श्रीराम जन्माचा नेत्रदिपक सोहळा संपन्न होणार.
भारतीय संस्कृतीचे प्रभू श्रीराम आदर्श. जीवनात प्रत्येक क्षणी विवेकाने कसे वागावे हे सांगणारे श्रीराम चरित्र.
श्रीरामांची मातृपितृ भक्ती.. एकनिष्ठता.. वचनपालनासाठी अपूर्व त्याग.. सत्यवचन, बंधुप्रेम.. राजधर्म.. धर्मशील, सर्वांप्रती आदरभाव.. 'सर्वे भवन्तु सुखिना' या वृत्तीने केलेला राज्यकारभार, निरहंकारीता, क्षमाशिलता सारेच भावणारे. त्यांनी सामान्यजनाकडून अगदी वानरांकडूनही अतुलनीय पराक्रम घडविला. त्यांचे नेतृत्व संयमी पण विजुगिषू वृत्ती निर्माण करणारे होते.
"नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे" हा वागणुकीने आदर्श ठेवला. वालीचे.. रावणाचे राज्य परत केले. समाजात अगदी नातेसंबंधातही संपत्तीवरुन वितुष्ट येवू नये.. कलह.. संघर्ष होवू नये हे हेतू.
प्रभू श्रीराम त्यांचे जीवन उद्दिष्ट होते ते समाजातील रावण वृत्ती नष्ट करणे. श्रीराम गुरु वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचेकडून शस्त्र अस्त्र विद्यापारंगत झाले. ते साहसी, पराक्रमी होतेच. पण सहकाऱ्यांना संधी देत कर्तुत्व सिद्ध करायला लावणारे नेतृत्व केले. शत्रूलाही शेवटच्या क्षणापर्यन्त संधी देत युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. वाईट कुणीच नसतो. वाईट असतो तो अहंकार. पराकोटीचा अहंकार बळी घेतो. यामुळेच 'मरणांती वैराणी' म्हणून रावणाचाही सन्मान करत सन्मान करणारे हे अलौकिक रामचरित्र.
रामायण ही विधात्याचीच जाणीवपूर्वक योजना. सत्ययुग संपले. मग त्रेतायुगात राम आले. पण रामायणाचा आदर्श विसरल्याने पूढे व्दापारयुगात महाभारत घडले, हा कलियुगासाठी विशेष संदेश.
कलियुग.. जे सत्य असत्याच्या गर्तेत अडकणार. निष्ठा.. प्रामाणिकता.. सत्याची गळचेपी होणार होती. स्वार्थ.. अहंकार परिसिमा गाठणार होता. शत्रूची रुपे बदलणार होती.
कलियुगात सुखसाधने वाढली तरीही लोकमानस अतृप्त, असमाधानी, अशांतच राहणार होते. काही आदर्श झाले तरीही त्यांचीही समाज वाटणी करणार होता. या कलियुगात समाजात.. कुटुंबात महाभारत घडू नये म्हणून मग सत्यवचनी श्रीराम चरित्र हे आदर्श आहे. आज जगभर हे श्रीराम चरित्रातील रामराज्य हाच जगासाठी रामबाण उपाय आहे, अन्यथा जगभर अशांतताच नांदेल. यामुळेच या रामजन्माचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
राजा दशरथाचा यज्ञ सुसंपन्न झाला. ज्या क्षणासाठी अयोध्यावासी अधिर होते तो क्षण अखेर आला. भरदुपारी सूर्यही क्षणभर थबकला. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच कौसल्या माऊलींचा कंठ दाटला. तिला अत्यानंदाने अश्रु आवरेनात. पुत्रदर्शनाने तिचे डोळे दिपले.
*वायू वेगाने ही वार्ता पसरली.. अयोध्या नगरी आनंदली. गोठ्यातील गाईं हंबरु लागल्या, त्यांना अवेळी पान्हा फुटला. राजप्रसादात सनईचौघडे निनादले. वाऱ्याचा वेग अचानक वाढल्याने कळ्यांनी उमलत काय झाले.. काय झाले.. असे विचारु लागल्याने वाराही हसला.*
अत्यानंदाने लोकांची राजप्रसादात झुंबड उडाली. या आनंदात बाळाच्या दिशेने कुणी फुले तर कुणी आपली आभूषणे उधळू लागले. सारे नगरजनच वाद्ये वाजवत नाचू लागल्याने शब्दही निशब्द झाले आणि महिलांच्या आनंदाला तर पारावर नव्हता. त्यांचा एकच उदघोष सुरु होता..
"राम जन्मला ग सखी, राम जन्मला.."
🌹🌸🍃🌹🙏🌹🍃🌸🌹
*चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि*
*ही तिथी*
*गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती*
*दोन प्रहरिं कां ग शिरीं*
*सूर्य थांबला ?*
*राम जन्मला ग सखी राम जन्मला*
*कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें*
*दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शन*
*ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला*
*राजगृहीं येइ नवी सैख्य-पर्वणी*
*पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणी*
*दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला*
*पेंगुळल्या आतपांत*
*जागत्या कळ्या*
*‘काय काय’ करत्पुन्हां*
*उमलल्या खुळ्या*
*उच्चरवे वायु श्वांस हसुंन बोलला*
*वार्ता ही सुखद जधी पोंचली जनी*
*गेहांतुन राजपथीं धावले कुणी*
*युवतींचा संघ एक गात चालला*
*पुष्पांजलि फेंकि कुणी,*
*कोणि भूषणें*
*हास्यानें लोपविले शब्द, भाषणें*
*वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला*
*वीणारव नूपुरांत पार लोपले*
*कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले*
*बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला*
*दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती*
*गगनांतुन आज नवे रंग पोहती*
*मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला*
*बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनी*
*सूर, रंग, ताल यात मग्न मेदिनी*
*डोलतसे ती ही, जरा शेष डोलला*
*Il श्रीराम जयराम जय जय राम ll*
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !! *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*०६.०४.२०२५*
संकलन:-अभय बक्षी, नागपूर.
🌻☘🌺🔆🌻🔆🌺☘🌻
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️
.jpg)
Comments
Post a Comment