वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार!
मोठी बातमी:-
वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार!
मानव-वन्यजीव संघर्षात सरकारी व्यवस्था निशाण्यावर?
मूल:-दीपक देशपांडे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगाव येथे आज शनिवारी सकाळी एका युवा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. शेषराज पांडुरंग नागोशे (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने मूल चितेगाव बेलघाटा,मोरवाही,मरेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ,
प्राप्त माहितीनुसार शेषराज हा त्यांच्या शेतातील भाजीपाला व धान पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. उमा नदीच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणि त्याचा मृतदेह नदी घाटातून दूर शेतातील झाडी झुडपात ओढत नेऊन ठेवला होता,या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे व बघ्यांची तोबा गर्दी उसळली आहे. या घटनेनंतर परिसरातील जनतेने घटनास्थळी धाव घेतली होती, हे वृत्त लिहिस्तोवर वनविभागाच्या वतीने पंचनामा व पुढिल चौकशी सुरू होती.
वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीतः-
चितेगाव परिसरात वाघाचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गुरुवारी याच वाघाने गावात घुसून एक गाय आणि एका गोऱ्ह्याला ठार केले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ही प्राणघातक घटना घडली. यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी व ग्रामस्थ यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे. सततचे वाघाचे हल्ले, मानवाची आणि पाळीव प्राण्यांची शिकार तसेच नागरिकांच्या जीवाशी सततच्या चाललेल्या या लुटूपुटूच्या खेळात शासन व्यवस्थेचे, घडणाऱ्या घटनांकडे काणाडोळा करून वेळ मारुन नेण्याचा प्रकार जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहत असल्याची प्रतिक्रिया जनतेतून उमटत असून आता हा संघर्ष परत एकदा विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सबब शासनाने यावर तात्पुरती मलमपट्टी करून चौकशी आणि वाघाच्या बंदोबस्ताचा दिखावा न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment