*महाब्रेकिंग* अखेर ती नरभक्षक वाघिण पकडण्यात वनविभागाला सुयश.

 *महाब्रेकिंग*

अखेर ती नरभक्षक वाघिण पकडण्यात वनविभागाला सुयश.



मूल, दीपक देशपांडे 

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मरेगाव… चितेगांव… परिसरातील  काल रात्री वनविभागाचे प्रयत्नाने  ती नरभक्षक वाघिण पकडण्यात यश मिळविले आहे .ज्या वाघिणीने चितेगांव येथील एका तरुणाचा बळी घेतला होता सावली – चंद्रपूर वनविभागातील सावली वनपरीक्षेत्र व चिचपल्ली वनपरीक्षेत्रात धुमाकूळ घालून ३ व्यक्तींचा बळी घेणारी, अनेकांना जखमी करणाऱ्या  वाघिणीला  अखेर बुधवारी रात्री जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

 सावली वनपरीक्षेत्रात निलेश दुर्गा कोरेवार, शेषराव नागोसे यांचा तर चिचपल्ली वनपरीक्षेत्रात मल्लाजी येगावार या मेंढपाळाचा या वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तर अनेकांना या वाघिणीने जखमी केले होते त्यामुळे या परिसरात भीतीचे  आणि संतापजनक वातावरण होते. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नागरिकांचा वनविभागावर दबाव  वाढत होता परंतु अनेकदा वाघिणीने  जवळ जाऊनही हुलकवणी दिली. अखेर बुधवारी रात्री या नरभक्षक  वाघिणीस सावली वनपरीक्षेत्रात  जेरबंद करण्यात आले. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांचे  नेतृत्वात वनविभागाच्या चमूने पार पाडली. चंद्रपूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगावकर  यांनी सदर वाघिणीला बेशुद्ध केले. वाघिणीला जेरबंद केल्याने नागरिकांनी  तुर्तास सुटकेचा निःश्वास सोडला असला तरीही वनविभागाचे  वतीने वाढलेल्या वाघांची संख्या लक्षात घेता वनविभागाच्या वतीने गावाजवळील जंगलाला कुंपण करण्याची मागणी पुढे ठेवली आहे,कारण या वाघिणीच्या तीन पिल्लांची वाढ याच भागात होणार असून एखादा नवीन वाघ वा वाघिण पुन्हा या परिसरात आपले बस्तान मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुर्तास वनविभागाच्या या कार्याचे कौतुक जनसामान्य करीत आहेत,पण त्यासाठी कित्येक मनुष्य व प्राण्यांना जीवन गमवावे लागले आहे, आणि त्यामुळे जनतेच्या भावना अनावर झाल्या व वनविभागाच्या विरोधात आंदोलन तिव्र करण्याची मागणी पुढे आली आणि यांत मोठमोठे राजकारणी मैदानात उतरले तेव्हा कुठे ही कारवाई केली गेली हे जनसामान्य कधीच विसरणार नाही.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.