जोरदार वारा, विजांचा लखलखाट, काळाकुट्ट अंधार तरीही जनजागृती सुरुच

 जनआक्रोश आंदोलन जनजागृती अभियान

तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे* याची सर्वांना आठवण.!!!



जिवती :-न्यूज ब्युरो 

 दि १५/०४/२०२५ ला मौजा वणी (खुर्द ) ता. जीवती जि चंद्रपूर येथे सकल मातंग समाज आयोजित सामाजिक न्याय पंधरवाडा अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर बैठक रात्री ८:३० वाजता सुरु झाली आणि आभाळ दाटून आले, जोरदार हवा सुरु झाली, विजा चमकायला लागल्या गावातील विधुत प्रवाह खंडित झाला. बैठकीला मार्गदर्शक म्हणून डॉ अंकुश गोतावळे, श्री व्यंकटी तोगरे, श्री रमाकांत जंगापले व श्री दीपक गोतावळे सर आलेले होते.

बैठकीचे अध्यक्ष तथा सकल मातंग समाजाचे राज्यसमन्वयक डॉ गोतावळे  यांचे मार्गदर्शन सुरु होते ते त्यांनी अंधारातही सुरूच ठेवले. तेव्हा उपस्थित तरुणांनी मोबाईल च्या टॉर्च सुरु केल्या आणि सभा चालूच राहिली. विशेष म्हणजे सभेला आलेल्या महिला लहान लहान मुलांना सोबत घेऊन आलेल्या होत्या.जोरदार हवा आणि विजांचा लखलखाट याला घाबरून कोणतीच महिला, नागरिक, तरुण जागेवरून उठले नाहीत. यावरून लक्षात येते की समाजबांधवाचा हा दृढ संकल्प निसर्गानेच बदल स्वीकारला आणि थोड्याच वेळात वारा कमी झाला, विजांचा लखलखाट कमी झाला आणि पुन्हा विद्युत प्रवाह गावामध्ये सुरु झाला.

 जर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये समाजाची तळमळ असेल आणि समाजाच्या मनात परिवर्तणाची इच्छा असेल तर त्यास कोणीही रोखू शकत नाही हे यातून स्पष्ट दिसून येते. म्हणूनच लोकशाहीर वामनदादा कर्डक म्हणतात "*तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, तुफानवारा पाऊसधारा मुळी न आम्हा शिवे,तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे*."

    सदर बैठकीचे प्रास्ताविक श्री रमाकांत जंगा पले, सूत्रसंचालन श्री परमेश्वर कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री परमेश्वर कांबळे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  दयानंद येरेकर,व्यंकटी कांबळे,दयानंद येरेकर, चंद्रकांत गोमाडे, प्रभुदास कांबळे, संग्राम वाघमारे, तुकाराम वाघमारे, शिवराम वाघमारे, सखाराम कोटंबे, अर्जुन शिंदे, वैजनाथ शिंदे, नवनाथ शिंदे, रामेश कांबळे, पांडुरंग पौळ, सांगितराव येरेकर, संजय शिंदे, दत्ता पौळ, साहेबराव पौळ, बालाजी कांबळे, धोंडीराम शिंदे, केशव कांबळे, बालाजी गायकवाड, आकाश कांबळे, राजकुमार कांबळे, रघुनाथ शिंदे, प्रवीण कांबळे, दादाराव कोटंबे, उमाकांत गोमाडे, दत्ता भालेराव 

सरूबाई शिंदे, शांताबाई शिंदे, शिंधूबाई वाघमारे, भगरताबाई कांबळे, मुक्त्ता गायकवाड, निर्मला बाई कांबळे, पार्वताबाई गवाले, शिवनंदा शिंदे, शेशूबाई कांबळे, रेणुका शिंदे यांनी प्रयत्न केले.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.