माझा दाखला मीच काढणार! या उपक्रमांतर्गत महसूलचे प्रमाणपत्र शाळेतच मिळणार — तहसिलदार मृदुला मोरे

माझा दाखला मीच काढणार! या उपक्रमांतर्गत महसूलचे प्रमाणपत्र शाळेतच मिळणार — तहसिलदार मृदुला मोरे



मूल :—दीपक देशपांडे 

 मान.मुख्यमंत्री महाराष्ट शासन यांच्या १०० दिवसांचा कलमी अंतर्गत मूल तालुक्यात नाविन्य उपक्रम योजना अंतर्गत "माझा दाखला मीच काढणार" हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


शाळा,महाविद्यालयांत प्रवेशासाठी लागणारे महसूल विभागाकडील जातप्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,१५ वर्ष रहिवासी प्रमाणपत्र,अधिवास,(डेामेशियल ) अधिवास प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर ,ईडब्लूएस,३०टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र,भूमिहीन असल्याबाबत ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना शाळेतच दिली जाणार आहेत.०२ एप्रिल २०२५ रोजी तहसील कार्यालयाकडून हा उपक्रम तालुक्यातील नवभारत विद्यालय मूल या  शाळेत राबविण्यात आला होता. अशी माहिती तहसिलदार मृदुला मोरे  यांनी दिली.



दिनांक २ एप्रिल २०२५रोजी नवभारत विद्यालय मूल येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले व या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे अध्यक्ष ॲड.अनिल वैरागडे,नायब तहसीलदार ओंकार ठाकरे,नायब तहसीलदार नंदकिशोर कुंभारे,  प्राचार्य अशोक झाडे ,व महसूल विभागाचे कर्मचारी, सेतू सुविधा केंद्राचे संचालक व कर्मचारी तसेच शाळेतील शिक्षक शिक्षीका व कर्मचारी उपस्थित होते,या कार्यक्रमात १५० विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.



विद्यार्थ्यांसाठी शाळा,महाविद्यालयांत शिबीर घेण्यात येत आहेत. ज्या शाळेत शिबीर आहे त्याच ठिकाणी महसूलचे अधिकारी,कर्मचारी,तलाठी,महाईसेवा केंद्रातील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी  संबंधित शाळेत संपर्क साधावा असे आवाहन तालुका प्रशासनाने केला असून विद्यार्थ्यांना एका छत्राखाली वा्जवी किंमतीत तातडीने हे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे, त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी या  उपलब्ध संधीचा फायदा घेण्याचे आवाहन जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या मूल शाखेतर्फे करण्यात आले आहे .

तसेच विद्यार्थी हितासाठी मूल शहरातील व तालुक्यातील शाळांनी हे शिबिर आपल्या शाळेत लावण्यासाठी तालुका प्रशासनाकडे पाठपुरावा करून ह्या शिबीराचा लाभ उपलब्ध करून देण्याचीही मागणी करावी असेही आवाहन जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या मूल शाखेच्या वतीने शाळेतील मुख्याध्यापक व संचालक मंडळांना केले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.