मूल तालुक्यातील ४९ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचे आरक्षण सोडतीची तारीख जाहीर.


ब्रेकिंग न्यूज:-
 मूल तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचे आरक्षण सोडतीची तारीख जाहीर.


मूल दीपक देशपांडे 

मूल तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचे आरक्षण सोडतीची तारीख  शासनाने जाहीर केली असून त्या आशयाचे पत्र सर्व संबंधितांना वितरीत करण्यात आले आहे. या पत्रातील मजकूर असा आहे......

ELECTION

TOP-PRIORITY

सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन

तहसिलदार, मूल यांचे कार्यालय

ईमेल : tahsildar.mul@gmail.com

दुरध्वनी क्रमांक 07174 - 220310 दिनांक - 16/04/2025

क्रमांक - कावि/म.सहा/निवड /2025/104

प्रति,

१. ग्राम महसुल अधिकारी सर्व २. ग्रामपंचायत अधिकारी सर्व

विषय -ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत

संदर्भ -

मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे पत्र क्रमांक साशा/कार्या-12/टे-4/ग्रापनि/2025/279 दिनांक - 04/04/2025

उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, मूल तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक २३ एप्रिल, २०२५ रोजी दुपारी ठिक २.०० वाजता कर्मवीर मा. सां. कन्नमवार सभागृहात करण्यात येणार आहे.

तरी आपल्या अधिनिस्त ग्रामपंचायत / आपल्या अधिनिस्त साझाअंतर्गत ग्रामपंचायतीचे सरपंच/उपसरपंच/सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांना सदर सभेला उपस्थित राहण्याबाबत तात्काळ आपल्या स्तरावरून सुचना द्याव्या. तसेच गावात दवंडीव्दारे सुध्दा सदर सभेबाबत व्यापक प्रमाणात प्रसिध्दी देण्यात यावी. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उलटटपाली या कार्यालयास सादर करावा.

असे तहसीलदार, मूल यांनी उपरोक्त पत्राद्वारे  कळविले आहे. 

या आशयाचे पत्राच्या प्रतिलीपी                                        १. मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना माहितीस सविनय सादर.  २. मा. उपविभागीय अधिकारी, मूल यांना माहितीस सविनय सादर.                                                                          ३. गट विकास अधिकारी पंचायत समिती, मूल यांना माहितीस तथा कार्यवाहीस अग्रेषित.                                              ४. मंडळ अधिकारी, मूल / चिखली / बेंबाळ / राजगड / चिरोली यांना माहितीस तथा कार्यवाहीस अग्रेषित करण्यात आल्या आहेत.

हे पत्र तहसीलदार, मूल यांचे स्वाक्षरीने प्रेषित करण्यात आले आहे.

यामुळे बऱ्याच काळापासून रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता लवकरच संपन्न होण्याची शक्यता बळावली आहे.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.