आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ, नवीन आधार कीटचेही वाटप..

 मोठी बातमी!आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ, नवीन आधार कीटचेही वाटप.

मुंबई:-न्यूज ब्युरो.

राज्यातील आधार केंद्र चालकांना अद्ययावत आधार संच मिळावे अशी मागील काही वर्षांपासून राज्यातील आधार केंद्रांची मागणी होती. त्यानुसार, आता पुरवठा केला जात आहे.

आता हे आधार संच माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत वितरीत करीत आहोत. आज मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांना बोलावून माहिती व तंत्रज्ञानंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते आधार संच सुपूर्त करण्यात आले.

डिजिटल सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णयही यावेळी मंत्री शेलार यांनी जाहीर केला. त्यामुळे, आधार केंद्र चालकांना आता एका नोंदणीमागे ३० रुपये अधिक मिळणार आहेत.

दरम्यान, नवीन अद्ययावत आधार संच उपलब्ध झाले असून मुंबई आणि मुंबई शहरातील सुमारे १०० आधार केंद्र चालकांना संच सुपूर्त करण्यात आले.

राज्यातील १२ कोटी ८० लाख आधार कार्ड नोंदणी पूर्ण झाली असून ज्यात ० ते ५ वयोगटातील नोंदणी 39 टक्के पूर्ण आहे,अशीही माहिती यानिमित्ताने जाहीर करण्यात आली .

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.