जागृत ग्राहक राजा मूलच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न !
जागृत ग्राहक राजा मूलच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न .
मूल:-दीपक देशपांडे
दिनांक ३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रेरणा आँनलाईन सेतू सुविधा केंद्रात जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रेरणा आँनलाईन सेतू सुविधा केंद्र संचालक प्रमोद मशाखेत्री यांनी भुषविले तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक गजानन रेकलवार हे उपस्थित होते .
गजानन रेकलवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करून देताना ते आपल्या प्रजेवर कसे प्रेम करायचे याचे वर्णन करताना आज प्रजादक्ष राजा आणि राज्यकर्ते दिसत नसल्याने ग्राहक एकाकी पडत चालला आहे आणि म्हणूनच ग्राहक संघटनेची गरज असल्याचे मत व्यक्त केले
.. तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रमोद मशाखेत्री यांनी जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या माध्यमातून आम्ही कार्य सुरू केले असल्याचे व त्यामुळे शासकीय दराने ग्राहकांना वेगवेगळ्या प्रमाणपत्रांचे वाटप करीत असल्याचे स्पष्ट केले. शासकीय योजना राबवताना अनेक अडचणी येतात बऱ्याचदा शासकीय अनुदान वेळेवर मिळत नाही तरीही ग्राहकांना समाधान मिळवून देण्यासाठी आम्ही शर्थीने प्रयत्न करीत आहोत आणि शासकीय योजना यशस्वीपणे राबवून ग्राहक समाधानी राहील असा प्रयत्न करीत असल्याचेही स्पष्ट केले, बऱ्याचदा आम्ही ग्राहक हितासाठी महिला व विद्यार्थ्यांना मोफत दाखलेही वाटप करीत असतो असेही आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डॉ आनंदराव कुळे यांनी केले याप्रसंगी जागृत ग्राहक राजा संघटनेचे सचिव रमेश डांगरे, संघटक तुळशीराम बांगरे, यांनी उपस्थितांना संबोधित करताना जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटनेचे कार्य आणि संघटनदृष्ट्या कार्य विस्तार करताना जनतेच्या सहभागाची आवश्यकता विशद केली आणि ग्राहकांची पदोपदी कशी फसवणूक केली जाते आणि ती टाळण्यासाठी ग्राहक जागृतीची आवश्यकता याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला व ग्राहक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निमित्ताने उपस्थित महिला, शोभाताई गोगीरवार,मायाबाई गोगीरवार,नंदा आभारे,उषा मशाखेत्री,सिमला गुलखरे यांना वेगवेगळ्या प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगती आँनलाईन सेतू सुविधा केंद्रातील आपरेटरसह , जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2m✍️

Comments
Post a Comment