आज जागतिक वसुंधरा दिन
आज जागतिक वसुंधरा दिन
पृथ्वी संतराणात् संतु नः पुण्य पुण्येन वातः ।
पुण्येन अधुष्ट पुण्य पृथ्वी पुण्येन सन्तु नः ॥
“पृथ्वीची रक्षा चांगल्या कृत्यांनी (पुण्याने) होऊ देत, आणि चांगली कृत्ये शुद्ध हवेने.. पाण्याने (पुण्याने) सुरक्षित राहावीत.”
पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली.
आज पृथ्वी अर्थात वसुंधरा दिवस. जगाच्या फार उशीरा लक्षात आले की आतातरी पृथ्वीचे संरक्षण करणे भाग आहे. मग अमेरिकन गेलार्ड नेल्सन यांनी प्रदूषण.. वन्यजीव ऱ्हास यावर जागृती केली. १९७० पासून 'वसुंधरा दिन'.. म्हणजेच 'अर्थ डे' चा जनजागृतीसाठी प्रारंभ झाला.
पृथ्वीचे अस्तित्व हे साडे चार अब्ज वर्षापासून आहे. पण आज जेवढी संरक्षणाची गरज आहे तेवढी आजवर कधीच नव्हती. मनुष्याच्या सुखाच्या कल्पनांना अंत नाही. नैसर्गिक संसाधाने तेवढीच अन् लोकसंख्या नित्य वाढतेय. मनुष्याचे सगळे ज्ञान हे सुखसुविधांच्या गरजांच्या पूर्तीसाठी खर्च होत आहे. जगभरात अनेक युद्ध सुरु आहेत. लढाईत विजयासाठी नवनवीन घातक शस्त्रात्रे उदयास येत आहेत. पर्यावरण संतुलन बिघडल्याने ऋतू चक्र बदललेय. वसुंधरा धापा टाकतेय. मानवी जीवन आणि पृथ्वी वाचविण्याचे आव्हान उभे ठाकलेय.
ॐ पृथ्वीदेव्यै विद्महे सहस्रमूर्तयै
धीमहि तन्नो पृथ्वी: प्रचोदयात्
सनातन भारतीय संस्कृतीनेच सर्वप्रथम पर्यावरणाचे महत्त्व ओळखले. ऋग्वेदात पृथ्वीचे महत्त्व आहे. पौराणिक ग्रंथात डोंगर.. नद्या.. समुद्र यांना आदराचे स्थान आहे. चंद्र.. सूर्य यांना देव मानले. 'समुद्रवृसने देवी' श्लोक म्हणत आम्ही जमिनीवर पहिले पाऊल ठेवतो.
इथे गोवर्धन पूजा होते. वाघ.. सिंह.. मूषक यांना देवता वाहन करतात. शंकराचार्य हे गंगा.. यमुना.. नर्मदा नदीचे अष्टक लिहून त्यांची स्तुती करतात. आमचे सर्वच संत निसर्ग महात्म्य सांगतात. जगदगुरु तुकोबा तर "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.." म्हणत अभेद्य नाते जोडतात.
नर्मदा परिक्रमा असो वा.. गिरनार परिक्रमा, यांना पुण्यदायी मानली जाते. उद्देश नदी परिसरात निसर्ग सहवास. इथे पूर्वी पशुपक्षी मनुष्याशी बोलायचे. आजही काही ठिकाणी पक्षी बोलतात. आम्ही पंचमहाभुतांना मानतो. वास्तू पूजनावेळी बांधकामात होणाऱ्या कीटक.. जीवांची क्षमा मागतो. वड पूजन करतो. आंब्याच्या डहाळी असो वा प्रत्येक सणाला वेगवेगळ्या फुलाफळांना महत्त्व आहे. धार्मिक आधार जोडून विविधांगी फुले.. फळे.. सर्वच वृक्ष वेलींचे संवर्धन हा उद्देश.
पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण.. वृक्ष संवर्धन करणे, नद्याचे जल स्वछ ठेवणे, जल.. वायु, ध्वनी प्रदूषण रोखणे, सभोवतालच्या पर्यावरणात स्वच्छता राखणे, शेतीत जैविक खतांचा वापर करणे इ. उपाययोजना सुचविल्या आहेत.
भारतातही उर्जा प्राप्तीसाठी सोलर एनर्जी प्रकल्प गावोगाव.. घरोघरी सुरू होत आहेत. समुद्रात जाणारे पाणी वाचावे.. दुष्काळ.. पूर समस्या टाळण्यासाठी नदी जोड प्रकल्प असे प्रयत्न होत आहेत. देशी गोधनाला वाचविले जात आहे त्याचा उपयोग नैसर्गिक शेतीसाठी, शुद्ध दुधासाठी होत आहे. प्लॅस्टीकचा किमान.. सुयोग्य वापर करणे. नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करणाऱ्या, स्वच्छ गावांना 'आदर्श गाव' पुरस्कार दिले जात आहेत. देशभर 'स्वच्छ भारत' संकल्पना मनामनात रुजवली जात आहे.
वृक्षारोपण.. संवर्धन ही जनतेची चळवळ झालीय. वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठी जंगले निर्माण होत आहेत. प्रदूषण मुक्त ई वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय. ई कचरा.. जैव वैद्यकीय कचरा याची योग्य विल्हेवाट लावली जातेय. त्याच्या कठोर पालनासाठी जनजागृती होत आहे.
हे प्रदूषण संकट एकट्यावरचे नाही. जगावरचे आहे. निराकरणास संपूर्ण जगाची साथ हवी. आम्ही शांततामय जगासाठी प्रयत्न करतो. जगातील युद्ध टाळण्यासाठी भूमिका बजावतो. आमच्या पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी या भूमातेच्या.. वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प करू या.
*पृथ्वी वायू जल अग्नी*
*अन् आकाशाचे गान*
*वसुंधरा अभियान*
*'माझी वसुंधरा' अभियान*
*एकच नारा आता येथे*
*ध्येय एक साऱ्यांचे*
*प्राणपणाला लावून करणे*
*संवर्धन श्रुष्टीचे*
*सहजीवनातून समृद्धी हे*
*आता नवे आव्हान*
*हिरवी आमुची सदैव धरणी*
*जीवनदायी पाणी*
*शीतल वायू संगे गाऊ*
*समृद्धीची गाणी*
*मंत्र सुखाचा महाराष्ट्राचा*
*जागवू हिरवे भान*
*माणूस आणि निसर्ग यातील*
*फुलताना हे नाते*
*अर्थपूर्ण या सहजीवनाची*
*वाट नवी उजळते*
*या जगण्याचा या जन्माचा*
*सुंदर हा सन्मान*
वसुंधरा अभियान
'माझी वसुंधरा' अभियान
संकलन -अभय बक्षी नागपूर
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️


Comments
Post a Comment