कर्मवीर महाविद्यालय मूल येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
कर्मवीर महाविद्यालय मूल येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सामाजिक भान ठेवत शिक्षणाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी भविष्याची वाटचाल करावी - प्राचार्या डॉ.अनिता वाळके यांचे प्रतिपादन
मूल - दीपक देशपांडे
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची दिशा दाखवली. फुलेंनी अंधश्रद्धा, जातिभेदाविरुद्ध लढा दिला, तर बाबासाहेबांनी शिक्षण हे शस्त्र मानून बहुजन समाजाला न्याय मिळवून दिला. आजचा विद्यार्थी या विचारांचा वारस आहे. त्याने सामाजिक भान ठेवत शिक्षणाचा योग्य वापर करून समतेचं, न्यायाचं आणि प्रगतीचं भविष्य घडवावं. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आपण सशक्त समाजनिर्मितीच्या दिशेने वाटचाल करूया.असे विचार शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मुल येथे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र ,राष्ट्रीय छात्र सेना ,राष्ट्रीय सेवा योजना आणि तसेच विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्य अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका मान. मीराताई शेंडे यांनी आपल्या व्याख्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थीदशेत असताना अपार दुःख सहन केले. जातीय भेदभाव, आर्थिक अडचणी असूनही त्यांनी शिक्षण घेतले. पुस्तकांवर प्रेम आणि ज्ञानाची भूक त्यांच्या यशामागे होती. आजचा विद्यार्थी अनेक सुविधा असतानाही शिक्षणात गांभीर्य कमी दाखवतो. बाबासाहेबांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन आजच्या विद्यार्थ्यांनी चिकाटी, शिस्त आणि समर्पणाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे शस्त्र आहे, हे बाबासाहेबांनी कृतीतून दाखवून दिले आहे.असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
११ एप्रिल ते १ मे २०२५ दरम्यान सामाजिक न्याय अभियान समान संधी केंद्र मार्फत सामाजिक न्यायावर आधारित चर्चा,परिसंवाद,वक्तृत्व,वादविवाद,निबंध स्पर्धा,पोस्टर स्पर्धा ई.उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मान. मीराताई शेंडे माजी मुख्याध्यापिका विश्र्वशांती विद्यालय सावली, डॉ. केवल कराडे ,डॉ.उज्वला कापगते, डॉ.गणेश गायकवाड, प्रा. दिनेश बनकर, प्रा.घनश्याम डोंगरवार,प्रा. प्रविण उपरे उपस्थित होते.
तसेच डॉ.गणेश गायकवाड आणि प्रा. प्रवीण उपरे यांनी विद्यार्थ्यांना जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिनेश बनकर,संचालन अविनाश चहारे बीकॉम द्वितीय तर आभार प्रा. सागर मासिरकर यांनी मानले.कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment