प्रशासनातील अधिकारी.... एकनाथ डवले
प्रशासनातील अधिकारी....
एकनाथ डवले

मंत्रालयातील कृषी विभाग पाटबंधारे विभाग आणि आता ग्रामविकास ही महत्त्वाची खाती सांभाळणारा एक महत्त्वपूर्ण अधिकारी म्हणून श्री एकनाथ डवले यांचा नावलौकिक आहे. आयएएस अधिकारी बसने प्रवास करतो हे तुम्ही कधी ऐकले आहे का .पण हे खरे आहे. हा उच्चपदस्थ आयएएस अधिकारी जेव्हा आपल्या खाजगी कामासाठी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील गावाला जातो तेव्हा शासकीय वाहन वापरत नाही.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा वापर करतो. आपण स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालो याचे त्यांना भान आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या गावात स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू केलेले आहे. त्यालाही आता १४ - १५ वर्षाचा कालावधी उलटला आहे. ते लोक होते वेगळे गर्दीत जे गेले पुढे मी मात्र मागे वळूनी पाहतो मागे किती जण राहिले या कविश्रेष्ठ श्री सुरेश भटांच्या ओळीप्रमाणे ते काम करीत आहेत. आयएएस होण्यापूर्वी श्री एकनाथ डवले हे चक्क शेती करत होते. आयएएस होण्यासाठी गेल्यानंतर मुलाखत घेणाऱ्या तज्ञ मंडळींना त्यांनी मी सध्या शेती करत आहे असे प्रश्नाचे उत्तर दिले आणि मुलाखत मंडळांनी विचार केला. हा माणूस आता शेती करतो आहे .हा जर प्रशासनात आला तर शेतकऱ्याचे प्रश्न सोडवू शकेल आणि त्यांनी या शेतकऱ्याच्या मुलाला शेतात राबणाऱ्या मुलाला आयएएस या भारतातल्या पहिल्या क्रमांकाच्या परीक्षेला पात्र ठरवले. विनम्रता व कार्य तत्परता त्यांच्या रक्तात भिनली आहे .
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक, मिशन आयएएस
अमरावती कॅम्प.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment