जागतिक पुस्तक दिनानिमित्त......!

 जागतिक पुस्तक दिनानिमित्त......!



संकलन -अभय बक्षी नागपूर.

पुस्तक हा भूतकाळ व भविष्यकाळातील एक अमूल्य दुवा आहे .भारतीय संस्कृतीच्या जतनात पुस्तकांचा मोलाचा वाटा आहे. अनेक पिढ्यांना घडवणारे ,विचार संपन्न करणारे पुस्तक आजही जीवनात दिशा देण्याचे कार्य कर्ते .याच पुस्तक प्रेमाला जागतिक स्तरावर साजरे करण्यासाठी युनेस्कोने 23 एप्रिल 1995 पासून जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. वाचनाची गोडी लागावी, आयुष्यभर शिकण्याची प्रेरणा मिळावी आणि साहित्याचे आयुष्यातील स्थान अधोरेखित व्हावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

          पुस्तक माणसाला नवे विचार देते, जीवनाला दिशा देते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी जगायला मदत करेल, पण पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवेल. यावरूनच पुस्तकांचे आयुष्यातील महत्त्व अधोरेखित होते. वाचनाने ज्ञान प्राप्ती, मनोरंजन, बौद्धिक आणि मानसिक विकास साधता येतो. वाचनाची गोडी लागल्यावर ती अविरत वाढत जाते.

 चांगल्या पुस्तकांचा सहवास म्हणजे मन , बुद्धी आणि आत्मा यांचा विकास करणारा अविरत प्रवास आहे. विविध भाषेतील आणि प्रकारातील साहित्य वाचल्याने आपले जग व्यापक आणि अनुभव संपन्न होते. वाचनातून समज वाढते, जाणीवा समृद्ध होतात आणि विचारांची कक्षा रुंदावते. म्हणूनच जागतिक पुस्तक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र वाचनाचा आनंद केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता दररोज अनुभवायला हवा. आजच्या पिढीला वाचनाची गोडी लागावी म्हणून आपण स्वतः वाचनात रमावे लागते. घरात वाचन करणारे आई-वडील असतील तर मुलांमध्येही वाचनाची सवय नकळत रुजते. म्हणून मोबाईल टीव्हीचा अतिरेक होणाऱ्या या युगात जर आपण पुस्तक उघडून मुलांसमोर बसलो तर त्यांनाही वाचनाची गोडी लागेल. नकळत वाचनाची बीजे पेरली जातील आणि हीच बीजे पुढे ज्ञानवृक्षात रूपांतरित होतील. वाचन संस्कृती टिकवणे ही केवळ शिक्षकांची किंवा संस्थाची जबाबदारी नाही तर प्रत्येक पालक नागरिक आणि समाज म्हणून आपली सामूहिक जबाबदारी आहे. वाचन संस्कृती अखंड जिवंत ठेवणे आपल्या हातात आहे. चांगल्या वाचकांची संख्या वाढवणे ही काळाची गरज आहे.

     वाचन संस्कृती अखंड जिवंत ठेवणे आपल्या हातात आहे. चांगल्या वाचकांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. आजच्या डिजिटल युगात लेखक, वाचक आणि प्रकाशकांनी तंत्रज्ञानाशी सुसंगत होऊन नव्या माध्यमातून वाचन संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. इंटरनेट, फेसबुक, युट्युब यासारख्या प्लॅटफॉर्मवरही साहित्याचा प्रसार व्हायले हवा ही काळाची गरज आहे. पुस्तकांचे पॉडकास्ट ,ऑडिओबुक्स, ई-बुक्स आणि सोशल मीडियावरील वाचन संवाद यामुळे वाचनाचा अनुभव नवा आणि रुचकर बनू शकतो.

          पुस्तक वाचनाच्या माध्यमातून आपण एकाच जागी बसून जगभरात भ्रमण करू शकतो. सोबतच वाचनातून आपण इतिहास, समाज, संस्कृती यांची सविस्तर माहिती मिळवू शकतो. इतिहास, समाज ,संस्कृती या साऱ्याचे प्रतिबिंब पुस्तकात उमटलेले असते. थोडक्यात सांगायचे तर पुस्तक हा समाजाचा आरसा असतो.

        जागतिक पुस्तक दिन हा वाचन प्रेमींसाठी स्वतःला साहित्याच्या जगात झोकून देण्याची अनमोल संधी आहे. आवडती पुस्तके वाचा ,पुस्तक पुनरावलोकन करा, पुस्तक क्लब सुरू करा किंवा साहित्यिक प्रश्नमंजुषा मध्ये सहभागी व्हा.

 हिच आज वाचन संस्कृतिच्या काळाची गरज आहे.

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.