जागृत ग्राहक राजाची नवीन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर.
जागृत ग्राहक राजाची नवीन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर.

दिलीप पाटील राज्य अध्यक्ष तर दीपक देशपांडे नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष, कोकण विभाग अध्यक्षपदी पवन पोलसांनी तर राज्य महिला अध्यक्ष पदी शैला शिळीमकर.
मसूर, जिल्हा सातारा:-न्यूज ब्युरो.
जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी दिलीप पाटील, संघटकपदी दिलीप फडके तर सचिवपदी प्रा. नागनाथ स्वामी, नागपूर विदर्भ विभाग अध्यक्षपदी दीपक देशपांडे ,कोकण विभाग अध्यक्षपदी पवन पोलसांनी, यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्राहक चळवळीत अग्रणी असलेल्या जागृत ग्राहकराजा या सामाजिक संस्थेची राज्यस्तरीय बैठक नुकतीच माळवाडी (मसूर) जिल्हा सातारा येथे झाली.
यावेळी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
यावेळी कोषाध्यक्षपदी विद्याधर कुलकर्णी, उपाध्यक्षपदी ॲड. अनिल गोडबोले, वसुधा- सावरकर, सहसंघटकपदी साधना पाटील, सहकोषाध्यक्षपदी नयन चव्हाण, राज्य विषय समिती समन्वयकपदी ॲड. किशोर लुल्ला,अभ्यास वर्ग प्रमुखपदी वसंतराव आपटे, अभ्यास वर्ग उपप्रमुखपदी प्रा.सतीश जंगम,महिला अध्यक्षपदी शैला शिळीमकर, महिला संघटकपदी प्राजक्ता पाध्ये,महिला उपाध्यक्षपदी नयन चव्हाण,सारिका पाटील,महिला सचिवपदी सविता बलकवडे, पुणे महानगर महिला अध्यक्षपदी दुर्गाताई शुक्रे, पुणे महानगर अध्यक्षपदी नवनाथ बांदल, यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

सर्व नवनिर्मित कार्यकारिणीचे खूप खूप अभिनंदन व ग्राहक राजा ला न्याय मिळवून देण्यासाठी अनंत अनंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा.जय ग्राहक -ग्राहक राजा जागा हो.अशोक मैदमवार मुल.
ReplyDelete