जिवंत सातबारा मोहिम मृत खातेदारांच्या वारसांची होणार नोंद.

 जिवंत सातबारा मोहिम:-    मृत खातेदारांच्या वारसांची होणार नोंद. 


          
     

        मूल  -दीपक देशपांडे 

'जिवंत सातबारा' मोहीमअनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात, त्यामुळे त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने शेतकरी त्रस्त होतात. 'जिवंत सातबारा' मोहीम, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची पारदर्शकता वाढवणारी आणि लोककल्याणकारी ठरणार आहे.

महसूल गावात चावडी वाचन:-महसूल विभागांतर्गत १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत मूल  तालुक्यात १ एप्रिलपासून सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व सातबारा प्राप्त नागरिकांनी मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीसाठी जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ घ्यावा, असे तहसीलदार मृदुला मोरे यांनी कळविले आहे.

सातबारा अभिलेखामध्ये मृतक खातेदारांचे नाव आजही मोठ्या प्रमाणात आहे. जमिनीच्या सातबारावर मयतांचे नाव असल्याने त्यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांमध्ये वारसांची ठराविक कालावधीत अधिकार अभिलेखांमध्ये नोंद  न झाल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी सभासदांची होणारी अडचण लक्षात घेऊन संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला आहे. सातबारा वरील मृतक खातेदारांच्या वारसांची नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन सातबारा अद्ययावत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. तालुक्यात सर्वच गाव पातळीवर जिवंत सातबारा मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी मूल स्थानिक उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या तहसीलदार मृदुला मोरे, ग्राम महसूल अधिकारी तसेच मंडळ अधिकारी  यांच्या सहकाऱ्यांसह महसूल यंत्रणा सज्ज आहे.

त्या अनुषंगाने मुल तालुक्यात सर्व मयत खातेदारांच्या  सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व नोंदी घेवून सातबारा ‘‘जिवंत’’ म्हणजेच अद्ययावत करणेसाठी मोहिम राबविण्यांत येत असुन मोहिम राबविण्यासाठी खालील प्रमाणे कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यांत येत आहे.

१. दि. १/०४/२०२५ ते ५/०४/२०२५ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी त्यांच्या साजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करुन न्यायप्रविष्ठ प्रकरणे सोडून गाव निहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे.

२. दि. ६/०४/२०२५ते २०/०४/२०२५ वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्युदाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख /स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील / सरपंच /ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व दुरध्वनी क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवास बाबतचा पुरावा ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थानिक चौकशी करुन मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे.

३. दि. २१/०४/२०२५ते १०/०५/२०२५ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा. त्यानंतर म.ज.म.अ. १९६६ च्या विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेवून त्यानुसार ७/१२दुरूस्ती करावा जेणेकरुन सर्व जिवंत व्यक्ती ७/१२ वर नोंदविलेल्या असतील.

वरीलप्रमाणे ‘‘जिवंत सातबारा मोहिम’’ राबविण्यात येत असून शहरी महानगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी, नगरपरीषद मूल व ग्रामीण भागात गट विकास अधिकरी, पंचायत समिती मूल यांच्यामार्फतीने सर्व गावागावामध्ये दंवडी देण्यासबंधाने संबधित गावाचे सरंपच, ग्रामपचांयत सदस्य, पोलीस पाटील, रेशन दुकानदार व त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती याचे माध्यमातुन व लॉउडस्पीकरव्दारे सदर मोहिमेबाबत दंवडीव्दारे प्रचार व प्रसिध्दी देण्यात आलेली आहे.

सदर कालबध्द कार्यक्रम विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत असुन सदर मोहिम यशस्वी करण्याकरीता गावातील प्रत्येक गावकरी व नागरीकांना आवाहन करण्यात येते आहे की दिनांक २०/०४/२०२५ पर्यत आपल्याकडील सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्या गावातील संबधीत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) याच्याकडे सादर करावे.असे आवाहन  मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे यांनी समस्त जनतेला एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.