li.आनंदी°पहाट.il नववर्षाच्या आतुरतेची

         li.आनंदी°पहाट.il

        नववर्षाच्या आतुरतेची

         संकलन:-अभय बक्षी नागपूर




    *चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे अहनि*

    *शुक्ल पक्षे समग्रेतु तदा सूर्योदये सति*

        *अर्थात ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना या चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात प्रथम दिनी प्रथम सूर्योदयाला केली. अशा या सनातन भारतीय संस्कृतीचा.. हिंदू नववर्षाचा प्रारंभ उद्या होत आहे.*

        *भारतीय संस्कृती जगात सर्वात पुरातन. यामुळे सर्वच धर्म-पंथाचे हे नववर्ष प्रारंभ. यामुळेच याच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचलाय.*

        *गावोगाव.. घरोघरी.. मंदिरात नववर्ष स्वागताची तयारी सुरु आहे. गावोगाव देखण्या शोभायात्रांची तयारी अंतिम टप्प्यात आलीय.*

        *चैत्र महिना मराठी नववर्षाचाही प्रारंभ. मग शोभायात्रेचा उत्साह अधीकच. शोभायात्रेचे आकर्षण म्हणजे शोभिवंत चित्ररथ.. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे तसेच मावळ्यांचे आणि संतांचे वेषधारी, ढोलताशा पथके, टाळकरी, लेझीम.. शिवकालीन शस्त्राची प्रात्यक्षिके, भजने, पारंपरिक मंगल वेषात नटलेली मंडळी, पारंपारिक मंगल वाद्यांचे सुमधुर संगीत.. आणि यात्रेच्या स्वागतासाठी भल्यामोठ्या रांगोळीचे रेखाटने यामुळे गावोगाव चैतन्य प्रकटणार. या शोभायात्रेत सहभागी बालगोपाल आणि महिला वर्गाचा उत्साह हा तर सर्वाधिक.* 

        *चैत्र महिना हा महत्वपूर्ण सणाचा महिना. या सणासाठी निसर्गही सिद्ध झालाय. तनामनात आनंद वाटणाऱ्या या शुभंकर महिन्याच्या स्वागतासाठी आपणही सिद्ध होवू या.*

        *आपणही अनुभवू चैत्र महिन्याच्या स्वागताची घरोघरची लगबग. ८२ वर्षापूर्वीचे हे गाणे पण आजही तीच चैत्र नवलाई.*

🌹⚜️🌸🥀🎶🥀🌸⚜️🌹

 *नटली चैत्राची नवलाई*

  *घालु सडा अंगणी चल ताई*

  *सकाळ आली बाई*

 *त्यावर काढू चल रांगोळी*

  *ठिपके देऊ आळिपाळी*

  *घेईन गरगर गिरक्या ताई*

  *मी तर भवरी बाई*

 *पूजिन तुलसी वृंदावन मी*

  *मागिन वर लवलाही*

🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹 

             *२९.०३.२०२५*

🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.