स्वयंसिद्ध लेखमाला:-८ निमित्तमात्र,८ मार्च जागतिक महिला दिन!
स्वयंसिद्ध लेखमाला:-८
निमित्तमात्र,८ मार्च जागतिक महिला दिन!
८ मार्च हा जागतिक महिला दिन' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. ८ मार्च १९०८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास निश्चित करणे, सुरक्षितता इत्यादी मागण्या करत निदर्शने केली. स्त्रियांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता. सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत 'क्लारा झेटकिन यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव मांडला व तो पास ही झाला तेंव्हा पासून ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात.
हा झाला इतिहास, महिला दिना विषयी. आज आपण फक्त एका दिवसासाठी साजरा करायचा आणि बाकी दिवस फक्त अत्याचार अपमान, किंवा, भिती, दडपण, कर्तव्य, बंधन हेच अंगावर लेणं घेऊन फिरायचे का?
तूच धरती तू अंबर
अन तूच जननी तू माता
तुझ्या मधूनी अवतरू दे
नवयुगाची निर्भयता
लाव कपाली टिळा मातीचा
घे उंच भरारी तू आता !!"
आजच्या २१ व्या शतकातील स्त्री ही वर वर्णन केलेल्या पंक्ती सारखी आहे. सर्व क्षेत्रात चमकत आहे. विविध क्षेत्रात 'ती' स्वतःला सिद्ध करत आहे. पूर्वीच्या का अगदी ऋषी मुनींच्या काळात पण त्या सिद्ध व सर्वगुण संपन्न अशाच होत्या. उदा. नारायणाची 'नारायणी' म्हणजे दुर्गा 'नार' म्हणजे जीव, प्राणी, ज्ञान असा अर्थ होतो. जीवनाच्या ज्ञानप्राप्तीचे प्रतिक म्हणजेच नारायणी. हे सर्व विश्व पूर्वी 'देवीरूपी' स्त्रियांनी तारले आहे. मग आजच का स्त्रियांना साधं जगण्यासाठीही धडपड करावी लागते ? तिला दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. पूर्वीच्या स्त्रियांमधला आत्मविश्वास ,आत्मशक्ती, साहस, निर्णय घेण्याची क्षमता, एकदम कुठे गायब झाली? त्याला कारणीभूत कोण ? हा अंत:र्मुख करणारा प्रश्नच आहे?
जरी काळ बदलत चालला आहे. स्त्री सुशिक्षित झाली. पण संस्कार विसरली, 'ती' समाजात खुप पुढे जात आहे, कमवत (आर्थीक दृष्टया) सक्षम होत आहे, पण सासू-सासरे फोटोत हवे. एकत्र कुटुंब नको, मंडळी नको 'फैशन' हवी. पण,घरात वडीलधारी मंडळी नकोत,कौटुंबीक बंधने नकोत. मोठ, मोठ्या रकमेचे पगार हवेत, व्यसने हवीत पण मूलबाळ नको. आपली भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था नष्ट होत आहे. आपल्या देशात 'अनाथ आश्रम' त्यांची संख्या व त्यात राहणाऱ्या 'आजी-आजोबांची' संख्या झपाट्याने वाढत आहे, ही एक खेद' जनक बाब आहे.
''स्त्री' ने 'स्त्रीशी'च शत्रुत्व करू नये, 'आई, बहिण, मूलगी, काकू, आत्या, मावशी, आजी, सासू असे विविध अंगाने नटलेले नातं सांभाळत एकमेकीं सोबत आनंदाने जगावं. मैत्रिणी सोबत जसे आपण मनातल सुख दुःख सांगतो, तसे 'निखळ' मैत्रिचे' नात ठेवाव. म्हणून म्हणावे असे वाटले
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेमळ जिव्हाळा, नकोत नुसती नाती !!"
सौ.भाग्यश्री भूमकर,उर्जानगर चंद्रपूर.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment