दिव्यांग महिलाश्रमाला वीस हजाराची आर्थिक मदत
दिव्यांग महिलाश्रमाला वीस हजाराची आर्थिक मदत
विकलांग सेवा संस्था पुढाकार
चंद्रपूर - दीपक देशपांडे.
स्वयंसेवी संस्थांना शासनानी जगविल्यापेक्षा समाजांनी तगवायची गरज समजून अमेरिकेत वास्तव्य असणारे मा. संजय रोडे व डॉ. अनुराधा रोडे यांनी ज्ञानार्चना स्वयंसेवी संस्थेच्या उपक्रमाला वीस हजाराची मदत विकलांग सेवा संस्था पदाधिकारी मा. देवराव कोंडेकर, प्रसाद पान्हेरकर, नंदा बिहाडे ,पूजा राखोंडे, राजश्री शिंदे ,सीमा दुपारे, पूजा चहारे, संजीवनी तसेच शरयू कुबेर यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आली तसेच नागपूरचे मा. हरीश देशमुख लिखित विज्ञान वर्धक आणि समाज अंधश्रद्धा विषयक माहिती असलेल्या पुस्तिका ही देण्यात आल्यात.
याबद्दल अर्चना मानलवार यांनी रोडे परिवार व विकलांग सेवा संस्था पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. अमेरिकेत असलेले मुळ विदर्भ पुत्र मा. संजय रोडे ह्यांनी ही सामाजिक बांधिलकी जोपसण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment