स्वयंसिद्ध लेखमाला:-१२ स्त्रीने अर्धांगिनी नव्हे तर अर्थांगिनी व्हावे!

 स्वयंसिद्ध लेखमाला:-१२

स्त्रीने अर्धांगिनी नव्हे तर अर्थांगिनी व्हावे!

रेणुका अभिषेक बक्षी/देशपांडे.

स्त्रीने अर्धांगिनी नव्हे तर अर्थांगिनी होण्याची आज गरज आहे.

गेला तो काळ जेव्हा पाककलेत सुगरण असणारी स्त्री ही एक उत्तम स्त्री असायची ..

उच्च शिक्षित स्त्री भूषण असायचे..घराचे,समाजाचे, पण आज नुसतं पाककलेत निपुण असून किंवा फक्त उच्च शिक्षित असून चालत नाही तर तिने पैसा ही कमवायला हवा..

त्याशिवाय बाहेरच नव्हे तर घरी ही स्त्रीला हवा तसा मान मिळत नाही ,स्त्री किती कमावते यावर तीच अस्तित्व अवलंबून असत..त्यात गृहिणीचं तर अस्तित्वच नसतं.

आज जी स्त्री उच्चशिक्षित आहे पण पैसे नाही कमवत तिला काहीच किंमत मिळत नाही ..प्रत्येक पाऊलावर तिला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत..

तिला हवं ते स्वातंत्र्य मिळत नाही , हवं तसं जगताही येत नाही..

सतत मनात एक न्यूनगंड घेऊन जगाव लागतं की आपण इतकं शिकलो पण पैसे नाही कमवत म्हणूनच कदाचीत आपली काहीच किंमत नाही..

आज जग इतक्या वेगाने पुढे गेलंय की आर्थिक स्वावलंबन नसणाऱ्या स्त्रीला कोणीच विचारत नाही..

 नवरा बायकोला विचारत नाही मग घरातील इतरांचा तर प्रश्नच नाही..,तिच्या विचारांना तिच्या मताला काहीच किंमत नसते..

जे ते ठरवतील ते निमूटपणे ऐकून घेणं सहन करणं इतकंच ती करू शकते..कारण काय तर काही बोलले तर मी कमावतो न मला माहिती आहे कस  मॅनेज करतोय किंवा अजून असंच काही बोलल्या जातं.. आणि म्हणूनच आज स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे.

परिस्थिती नसेल तर एकवेळ कमी शिका पण आर्थिक स्वावलंबन मिळवा...

एखादी नौकरी करा, लहान मोठा व्यवसाय करा किंवा शिकवणी घ्या..पण पैसा कमवा....कारण आज पैसाच आपलं अस्तित्व ठरवतो, आपली किंमत ठरवतो..

अर्थात सगळ्या गोष्टींच्या दोन बाजू असतात तसंच यालाही काही लोक अपवाद असतीलच नव्हें आहेतच ...पण ढोबळमानाने बघायचं झालं तर एकंदर हीच परिस्थिती आज सगळीकडे दिसते आहे..मग तुम्ही सुशिक्षित असाल नाहीतर अशिक्षित अथवा अर्धशिक्षित... कारण कमावती ही कमावतीच असते सगळ्या कुटुंबाची पालनहार असते असा समज की गैरसमज सगळ्यांचाच झालेला असतो.

मात्र तुटणाऱ्या कुटुंब व्यवस्थेकडे कुणाचेच फारसे लक्ष नसते आणि नवीन पिढीची आबाळही तेथूनच सुरू होते ....हे सगळ्यांनाच दिसतं पण.....पण तरीही तूझं अस्तित्व टिकविण्यासाठी तू अर्थांगिनी व्हायलाच हवं आहे.

ही कुटुंबातील प्रत्येकाची इच्छा आणि स्वयंपूर्ण  होण्यासाठी तुझी गरज झाली आहे.

शेवटी इतकचं म्हणेल..

भारतमातेच्या कर्तृत्ववान महिलांची प्रतिकृती तू..

हो अर्थांगिनी, घे भरारी गाठ उंच शिखर तू..

नको पडू संसाराच्या मोहमायेत कारण फसशील तू..

दोन दिवस मौज वाटेल मग स्वतःला हरवशील तू..

हो अर्थांगिनी , घे भरारी गाठ उंच शिखर तू..

जपताना नाते गोते ,सारेच काही बाजूला राहील ..

तू अर्थार्जन करत नाही याचा न्यूनगंड तुला येईल..

हो अर्थांगिनी , घे भरारी गाठ उंच शिखर तू.

शेवटी तूच हो तुझीच भाग्यविधाता..

कारण 'आर्थिक स्वावलंबन 'काळाची गरज आता..

म्हणूनच हो अर्थांगिनी , घे भरारी गाठ उंच शिखर तू.

भारतमातेच्या कर्तृत्ववान महिलांची प्रतिकृती तू..

रेणुका अभिषेक बक्षी/देशपांडे.

नागपूर.

संपादक,✍️Ddbatmi@m2M✍️

ज्यांच्या उत्तम  सहकार्याने आम्ही ही लेखमाला तुमच्यापर्यंत उत्तम रीतीने पोहोचवू शकलो , आणि आजपर्यंत आमच्या  पुढ्यात आलेले विषय बघता  असा एखादा  विषय  असावा ही आमची संकल्पना होती, त्यामुळे आमच्या विनंतीवरून हा एक वेगळा विषय तुमच्यापुढे ठेवलाय ,ही लेखमाला समाप्तीनंतर ,संपादकीय टिपणीच्या निमित्ताने हा लेख आम्ही प्रकाशित करणार होतो मात्र तो जाणिवपूर्वक आधी प्रकाशित करीत आहोत.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.