दोन दिवस! दोन मेंढपाळ !! वाघाच्या हल्ल्यात ठार!!!

 आज मूल येथील मेंढपाळ मल्लाजी येगेवार वाघाच्या हल्ल्यात ठार.


मूल: दीपक देशपांडे 

 मूल शहराजवळ शेतात असलेल्या मेंढ्याच्या कळपावर वाघाने हल्ला करीत मल्लाजी येगेवार रा. मूल यास ठार केले. ही घटना शुक्रवारी रात्रीची , म्हणजे  शनिवारी सकाळी पहाटेच्या सुमारास घडली असून  सकाळी उघडकीस आली. मूल तालुक्यात पहिल्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी मेंढपाळास ठार केल्याची ही दूसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मूल शहरापासून सोमनाथ मार्गावर अगदी हाकेच्या अंतरावर शेतात रात्री मुक्कामी असलेल्या शेळ्या मेंढ्याच्या कळपावर हल्ला करीत मेंढपाळ मल्लाजी येगेवार वय, ६० वर्ष रा. मूल यास ठार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.

 कालच एमआयडीसी परिसरात निलेश कोरेवार  या मेंढपाळाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.


कालच एमआयडीसी परिसरात निलेश कोरेवार या मेंढपाळाचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला. तर आज मल्लाजी येगेवार यांचा मृत्यू झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या दोन वेगवेगळ्या घटना मूल तालुक्यातील अवघ्या तीन ते चार किलोमिटर अंतरावर घडल्या असल्या तरीही  कालची घटना वनपरिक्षेत्र सावली मध्ये घडली असून आजची घटना वनपरिक्षेत्र मूल तालुक्यात घडली आहे.

ह्या  दोन घटना एकाच तालुक्यातील असतांनाही वनपरिक्षेत्र दोन दोन वनपरिक्षेत्रात  येत असल्याने नागरिकांना दोन वेगवेगळ्या वनपरिक्षेत्रात  नाहक चकरा माराव्या लागत असून जनतेसाठी फारच त्रासदायक  ठरू लागले आहे.

हा एकच वाघ असण्याची  शक्यता बळावली असून या वाघाच्या बंदोबस्ताची  व वाघास जेरबंद करण्याची मागणी मूल तालुक्यातून होत आहे आणि वन्यजीव व मानव संघर्ष वाढण्याची शक्यता बळावली आहे, परिणामी वनविभागाच्या वतीने किती तातडीने कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.