स्वयंसिद्ध लेखमाला:-४ महिला सशक्तीकरण: शब्द नव्हे, कृती हवी!

 स्वयंसिद्ध लेखमाला:-४

महिला सशक्तीकरण: शब्द नव्हे, कृती हवी!













सर्वप्रथम, महिला दिनाच्या  या खास दिवशी, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हा दिवस संपूर्ण जगभरात महिलांच्या हक्कांसाठी, समानतेसाठीच्या संघर्षासाठी, आणि त्यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.

महिला सशक्तीकरणाची गरज

महिलांचे सशक्तीकरण म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही, तर त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी आहे. स्त्री शिक्षित झाली की संपूर्ण कुटुंब, समाज आणि देश शिक्षित होतो. त्यामुळे शिक्षण, स्वावलंबन, आणि आत्मनिर्भरता हीच खरी महिला सशक्तीकरणाची गुरुकिल्ली आहे.

महिला हक्क : संघर्ष आणि वास्तव

आपल्या संविधानाने महिलांना समान हक्क दिले असले, तरी आजही त्या लैंगिक भेदभाव, वेतन असमानता, घरगुती हिंसा आणि अन्यायाला तोंड देत आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सन्मान या मूलभूत गोष्टींसाठी महिलांना संघर्ष करावा लागतो, हे आपल्या समाजाचे वास्तव आहे.

महिला सशक्तीकरण: शब्द नव्हे, कृती हवी!

समाजाची जबाबदारी आणि आपला सहभाग

महिला दिन साजरा करताना, आपण महिलांच्या संघर्षाला केवळ सहानुभूती न दाखवता, त्यांच्या हक्कांसाठी खऱ्या अर्थाने पुढाकार घेण्याचा निर्धार केला पाहिजे. आपल्या कुटुंबातील, कार्यालयातील आणि समाजातील महिलांना समान संधी मिळत आहेत का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

महिला म्हणजे केवळ सहनशीलतेचे प्रतीक नव्हे, तर त्या शक्ती, धैर्य आणि आत्मनिर्भरतेच्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यामुळे, महिला हक्क आणि सन्मान ही केवळ एक दिवसाची चर्चा न राहता, तो दररोज कृतीत उतरावा, हीच या महिला दिनाच्या निमित्ताने आपली जबाबदारी आहे.

समाजातील महिलांचे योगदान

आजच्या युगात महिला शास्त्रज्ञ, डॉक्टर, शिक्षक, सैनिक, उद्योजिका आणि राजकारणी म्हणून आपली ओळख निर्माण करत आहेत. कल्पना चावला, किरण बेदी, मिताली राज यांसारख्या महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आपणही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महिलांना योग्य शिक्षण, सुरक्षितता आणि संधी देण्याचा संकल्प केला पाहिजे.चला, आपण सर्वजण मिळून महिला हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध होऊ.

धन्यवाद! जय हिंद ! जय महाराष्ट्र!

प्रा. हर्षा खरासे

कार्यकारी प्राचार्या

शूरवी महिला महाविद्यालय मूल.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.