स्वयंसिद्ध लेखमाला:-७ महिला आणि नेतृत्व.

 स्वयंसिद्ध लेखमाला:- ७

महिला आणि नेतृत्व!



अल्का वरगंटीवार कुंदावार 

आज जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. मुली शिकल्या तर कुटुंब सुधारते आणि त्यातून शब्द विकसित होते. पूर्वी 'चूल आणि मूल' या बेडीत अडकलेली महिला आज शिक्षणामूळे स्वावलंबी झाली आहे. ती स्वयंनिर्णय घेत आहे.

आजच्या घडीला महिला फक्त घराच्या कर्त्या किंवा कुटूंबाच्या आधारस्तंभासारख्या भूमिकेत नाहीत त्यांना विविध क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. आणि त्या आपल्या कार्यक्षेत्रात नवा आदर्श निर्माण करत आहेत. त्यांचे नेतृत्व, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचे योगदान एक नवा आदर्श ठरु लागले आहे. त्यांच्या नेतृत्वातून केवळ व्यक्तीचे, कुटूंबांचे किंवा संस्थेचे भले होत नाही तर त्या समाजाच्या मूलभूत बदलाचे कारण बनतात. महिलांचे नेतृत्व एक समाजसेवा' आहे, जे अस्तित्वामुळेच स्फूर्तिदायक असतं.

स्त्रियांच्या संरक्षणासाठी व मानसन्मानासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. तसेच स्त्रियांबद्दलचा पुरुषांचा पारंपारिक दृष्टिकोणही आता बदलत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. तथापि सामान्य महिलांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्यच ठरले आहे.

८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो; परंतु महिलांचा सन्मान हा एका दिवसापुरताच करायचा नसून तो कायमस्वरूपी करायला हवा. याची रुजवण मुलांमध्ये बालवयात होणे गरजेचे आहे.

अल्का वरगंटीवार कुंदावार 

मुख्याध्यापिका, नवभारत कन्या विद्यालय मूल.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.