स्वयंसिद्ध लेखमाला:-१.जागतिक महिला दिवस १

 स्वयंसिद्ध लेखमाला:-१.

जागतिक महिला दिवस ,एक आवाहन....!

८ मार्च जागतिक महिला दिवस मोठ्या थाटामाटाने जगभर साजरा केला जातो. आणि दुसऱ्याच दिवशी बातमी येते कि, एका चिमकुलीवर बलात्कार झाला. मग आपले सक्षमीकरण झाले का ? शिक्षणाने सक्षमीकरण होते असेही नाही. आपल्या जीवनशैलीमध्ये राहणीमान, खाण्यापिण्याच्या पध्दती बदलल्या किंवा आधुनिकता आली म्हणजे स्त्री सक्षम झाली असेही नाही. शिक्षणासोबतच स्वत:चा व्यक्तिगत विकास होणे खुप गरजेचे आहे. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग खन्या अर्थाने स्वतःला, कुटुंबाला व सोबतच समाजाला होणे खुप आवश्यक आहे.

१६ ते १७ व्या शतकातील स्त्रिया शिक्षण जरी कमी असले तरी वेगवेगळ्या कला कौशल्यामध्ये निपुण होत्या. पतिच्यामागे स्वत:चे कुटुंबाचे व राज्यांचे संरक्षण अगदी मरेस्तोवर करायच्या. खंबीरपणे उभ्या राहायच्या. निर्णयक्षमता होती. समाजातील मानसिक विकृती अगोदरही होती व आजही आहे. ह्या विकृतीला जेव्हा वाचा फोडु, लढा देऊ,जिथे रात्रीच्या अंधाराची भिती तुला वाटणार नाही,एकट्याने तुला कुठेही बिनधास्तपणे जगणे सोपे जाईल आणि ज्या दिवशी वृत्तपत्राच्या विकृत बातम्या संपेल बहुतेक तोदिवस आपल्या सक्षमीकरणाचा नक्कीच राहील.

स्त्री म्हणुन जन्माला येणे म्हणजे भाग्यवान तू. सृष्टीची निर्मिती ज्या उदरातुन झाली तीला अबला म्हणुन संबोधुच नये आणि तो अधिकार कुणाला देऊही नये. 

शतक पालटले तू शिक्षित झाले. तू शिक्षित होण्यासाठी कित्येकाने शरीरावर शेणमातीचे गोळे सहन केले. मग पुढची लढाई आता तू लढ, बन स्वत: स्वावलंबी शारिरीक व मानसिकरित्या हो कणखर छोट्या छोट्या गोष्टीत अडकण्यापेक्षा कर संघर्ष मोठा. तुझ्या सकारात्मकतेचे बीज रोव आपल्या कुटुंबात आणि समाजात. क्षणभंगुर आधुनिकतेच्या जाळ्यामध्ये अडकण्यापेक्षा स्वत:ची प्रतिभा ओळख आणि आकार स्वत:च्या कलाकौशल्याला स्त्री म्हणुन जन्माचे होऊ दे सार्थक नाही बनली जिजाई तरी चालेल पण वारसा चालव स्त्री मधल्या आईचा. 

बन सावित्री या आधुनिक जगाची जा चार पावले पुढे तिच्या, वाट केली आहे मोकळी तिने दाखव तुझे सामर्थ्य या जगाला ..........

प्रा.डाॅ.सौ. भावना प्रमोद टेकाम

प्राचार्या, देवनील नर्सिंग कॉलेज मूल.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.