जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या झंझावाती दौऱ्यात अनेक समस्या मार्गी!
जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या झंझावाती दौऱ्यात अनेक समस्या मार्गी!
मूल,दीपक देशपांडे
दिनांक ५ मार्च २०२५ रोज बुधवार ला माननीय जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांनी मूल तालुक्यातील विविध योजनांची माहिती आणि कार्याची प्रगती यांची पाहणी केली.
या दौऱ्यात सर्वप्रथम त्यांनी चिरोली येथील ब्रिज बंधाऱ्याची पाहणी व लिफ्ट इरिगेशन ची पाहणी केली, तसेच मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकामाची(१००खाटांचे ) पाहणी केली, चिमढा येथील मानव विकास अंतर्गत गोडाऊन चे उद्घाटन केले तिथे मा.जिल्हाधिकारी साहेबांनी वृक्षारोपणही केले, राजगड ग्रामपंचायत येथे भेट देऊन ग्रामपंचायत अंतर्गत विविध उपक्रम व विकास कामे याबाबत माहिती घेतली.... सदर भेटीदरम्यान माननीय उपविभागीय अधिकारी अजय चरडे व ,तहसीलदार मृदूला मोरे मूल, गटविकास अधिकारी बि.एच.राठोड व इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या या पाहणी दौऱ्यात अनेक रखडलेल्या आणि भरकटलेल्या कामांना गती आणि योग्य नियोजन करून कार्यारंभ आईसाठी योग्य दिशा मिळण्याची शक्यता बळावली आहे.
दीपक देशपांडे, ✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment