कृषी महाविद्यालयाच्या प्रयास २०२५ वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांगता समारंभ.

 कृषी महाविद्यालयाच्या प्रयास २०२५ वार्षिक स्नेहसंमेलनाचा  सांगता समारंभ.



मूल, दीपक देशपांडे 

येथील कृषी महाविद्यालयाने स्थानिक कन्नमवार सभागृहात 'प्रयास २०२५' नावाने दोन दिवसांचा स्नेहसंमेलनाचा वार्षिक महोत्सव अत्यंत उत्साहाने आयोजित केला होता. या वार्षिक महोत्सवाचा समारोप समारंभ कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्रा. चंद्रकांत मणियार, आणि जागृत ग्राहक राजा या संघटनेचे अध्यक्ष, पत्रकार दीपक देशपांडे, सहयोगी प्रा.रमाकांत गजभिये  हे  उपस्थित होते. 

पाहुण्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि पुष्पहार अर्पण केला. प्रा. मणियार यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना जीवनात कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. आत्मविश्वास आणि समर्पणाने जीवनात यश मिळवणे शक्य आहे असे मत व्यक्त केले. 

दीपक देशपांडे यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव कथन  करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करून यश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ,गेलेला क्षण फिरुन माघारी आणता येत नाही, त्यामुळे आज उपलब्ध प्रत्येक संधीचे सोने करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्या महाविद्यालयीन काळातील आठवणी उजागर करण्याचा प्रयत्न केला व विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक आणि उपस्थित सगळ्यांना काही क्षण खिळवून ठेवण्यात यश मिळवले , आणि एक सजग ग्राहक बनण्याची कामनाही यानिमित्ताने व्यक्त केली.

डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयातर्फे राबविल्या गेलेल्या विविध उपक्रमांची माहिती  देताना सांगितले की, महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमीच त्यांना पाठिंबा देईल. महाविद्यालयातील अभ्यासासोबतच विविध कलांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले व विविध उपक्रमातील विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागाची प्रशंसा ही केली.

या कार्यक्रमात, वार्षिक महोत्सवादरम्यान, विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला, वादविवाद, एकल नृत्य, गट नृत्य, लगौरी, कबड्डी , क्रिकेट , बुद्धीबळ , वादविवाद इत्यादी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, या स्पर्धांमधील विजेत्यांना  पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच वर्षभरात झालेल्या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांनाही बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण प्रमुख  पाहुण्यांनी केले.

या  बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मोहिनी पुनसे आणि प्रा. डॉ. गीतांशू डिंकवार यांनी  केले. सर्व विजेत्यांचे भेटवस्तू  व प्रमाणपत्र आणि विशेष  पदक  देऊन अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा  देण्यात  आल्या . प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला असल्याचे दिसून येत होते,आणि विजेते व उपविजेत्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

 एकुणच दिवसभरातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रानी बांते आणि त्रिकोण रँडे या विद्यार्थ्यांनी अत्यंत  सुबकतेने केले,

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक जण प्रफुल्लित होते, कुठे थकवा जाणवत नव्हता. 

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.