हिंदू नव वर्ष (गुढी पाडवा) निमित्त भव्य शोभायात्रा व वेशभूषेसाठी आकर्षक बक्षिसे.. वर्ष (गुढी पाडवा) निमित्त भव्य शोभायात्रा व वेशभूषेसाठी आकर्षक बक्षिसे
हिंदू नव वर्ष (गुढी पाडवा) निमित्त भव्य शोभायात्रा व वेशभूषेसाठी आकर्षक बक्षिसे.
मूल दीपक देशपांडे.
गुढी पाडवा उत्सव समिती मूल च्या वतीने चैत्र शुक्ल प्रतिपदा युगाब्ध ५१२७ रोज रविवार दिनांक ३०/०३/२०२५ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता रामलिला सभागृह ते गुजरी चौक, मूल पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
गुढीपाडवा उत्सव समिती मूल चे वतीने या गुढीपाडवा शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या महिला ग्रुप ना उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत.
१.प्रथम पुरस्कार. ..३०००/-₹.
२.द्वितीय पुरस्कार ...२०००/-₹.
३.तृतीय पुरस्कार......१०००/-₹.
तसेच
वैयक्तिक वेशभूषा पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहेत.
१).महिला उत्कृष्ठ वेशभूषा....... तीन बक्षीस
२).युवती उत्कृष्ठ वेशभूषा.......तीन बक्षीस
३).बालिका उत्कृष्ठ वेशभूषा....तीन बक्षीस
त्यासाठी स्पर्धकांनी
.१) अविनाश पाल 8007214245
२) आशाताई गुप्ता 8379932363 यांचे सोबत संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
त्याचप्रमाणे राष्ट्र एवम धर्म रक्षनासाठी सदर कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांनी अवश्य सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत निमंत्रण देताना निमंत्रण पत्रिकेवर
*गर्व से कहो हम हिंदू है*
*जय भवानी जय शिवाजी जय संभाजी*
*हिंद्वा सोदरा सर्वे*
*न हिंदू पतीतो भवेत*
*मम दिक्षा हिंदू रक्षा*
*मम मंत्र समानता*
*जय हिंद*
*वंदेमातरम*
*भारत माता की जय* यांसारख्या संदेशांना स्थान देण्यात आले आहे व धर्म रक्षणासाठी तत्पर असण्याचे आवाहन करण्यात आले आहे , त्यामुळे आयोजकांनी अनेक प्रश्न एकत्रितपणे हाताळण्याची संधी साधली आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment