स्वयंसिद्ध लेखमाला:-९ आम्ही महिला.. गृहिणी ते अधिकारी !

 स्वयंसिद्ध लेखमाला:-९

 आम्ही महिला.. गृहिणी  ते अधिकारी !                


             महिला दिनाचे औचित्य साधून मला आज काहीतरी लिहावेसे वाटलं,म्हणूनच लेखणी हातात घेतली. खरंच आपण जर विचार केला तर या पृथ्वीवर जर स्त्री नावाचे काही नसते तर ..कल्पनाच करवत नाही.....तिला अनेक नावं आहेत .                  

स्त्रियांची स्थिती ही पुर्वी अधिकच चिंताजनक होती.तिला शिक्षण घेता येत नव्हते.विवाहाचे वय,८..९ वर्ष. विधवा विवाहाला परवानगी नव्हती. चूल व मुल हे तिच्यासाठी मर्यादित क्षेत्र होते.त्या पती,पुरुषी वर्चस्वा खाली वावरत होत्या.                    

 आधुनिक काळात (१९१८ ). इंग्रजांनी भारतीय संस्कृतीत अनेक बदल केले.लोकहितवादी राजा राममोहन रॉय,महात्मा जोतिबा फुले, सावित्री बाई फुले,महर्षी कर्वे या समाजसुधारकांनी अनिष्ट चाली रीती मोडून काढल्या.                    महिलांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार , दर्जा मिळवून देण्यासाठी पुनर्विवाह, अस्पृश्यता स्वातंत्र्य,व शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.समाजातील अनेक अनिष्ट रूढी बंद केल्या.                          

सावित्री बाई यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करून स्त्रीयांना साक्षर केले. अबला नाही सबला आहात हे बाळकडू पाजले. त्यांनीच खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पाया घातला. त्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत.त्यामुळेच स्त्रियांना विविध क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळाली. महिलांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळण्याचे ध्येय नक्कीच त्यांना आहे.                               

महिलांमध्ये सहनशक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची ताकद असल्यामुळे देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान दिलेले आहे.भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला आदराचे स्थान असून,अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे. सर्वच क्षेत्रात महिलांनी पुरुषा बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे.म्हणूनच मातृशक्ती हा देशाचा पाया आहे.   भारतीय महिलांनी शैक्षणिक, सामाजिक विकासाला हातभार लावला,तसंच सांस्कृतिक,चित्रपट,कला, साहित्य, नृत्य,पायलट,अंतराळ वीर, शास्त्रज्ञ,संगीत,कायदा, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.राजकीय क्षेत्रात भरारी मारली आहे ,देशाचे पंतप्रधान ते राष्ट्रपती पद भूषविले आहेत, नावलौकिक प्राप्त केला.पोलिस क्षेत्रात कितीतरी महिला. पोलीस शिपाई ते इन्स्पेक्टर, कमिश्नर म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात बचत गट,महिला मंडळे,चालवून स्त्रीयांना सक्षम करण्यासाठी अधिकारी  बनून पुढे येत आहेत.                     

महिलांनी मानाच्या जागा आपल्या कुशलतेच्या बळावर संपादन केल्या आहेत. सर्वच पदावर महिला सक्षमतेने जबाबदारी पार पाडत आहेत. देशाच्या प्रगतीत विविध क्षेत्रात स्त्रियांचे योगदान मौलिक आहे.अशी ही महिला अतुलनीय अवर्णनीय आहे.                           

"महिलां ही न राहिली अबला.     

ती झाली आहे आता सबला 

वाकड्या नजरेने जर पाहिला.       

सक्षम ती करणार मुकाबला ".         


अल्का शिरीषराव राजमलवार/येरोजवार 

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका

नव भारत कन्या विद्यालय,मूल.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.