ग्राहक समस्या निवारणासाठी प्रशासनावर दबाव गट तयार करा .



 ग्राहक समस्या निवारणासाठी  प्रशासनावर दबाव गट तयार करा
 श्यामकांत पात्रीकर अध्यक्ष, विदर्भ प्रांत ग्राहक पंचायत महाराष्ट्र,यांची मागणी 
आणि 
 जागृत ग्राहक राजा नागपूर, विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांचे समर्थन.


नागपूर, न्यूज ब्युरो 

ग्राहक समस्या निवारणार्थ शासन निर्मित व्यवस्था कुचकामी ठरल्या असून, प्रशासनाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, राष्ट्रीय ग्राहक आणि जागतिक दिनाबाबतची उदासीनता, ग्राहक संरक्षणाच्या नियमित बैठका न होणे यासाठी प्रशासनावर अंकुश ठेवणारा ग्राहक संघटनांचा दबाव गट तयार होणे आवश्यक आहे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांनी केले. 

ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि रोटरी क्लब नॉर्थ नागपूरतर्फे जागतिक ग्राहक दिन साजरा  करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना पात्रीकर पुढे म्हणाले की, ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि रोटरी क्लब यांनी मध्यस्थ कक्ष स्थापन करून या समस्या मार्गी लावाव्यात.

ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे वैचारिक अधिष्ठान स्वामी विवेकानंद आणि प्रेरणास्रोत ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या स्मृतीला वंदन करून जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सल्लागार संचालक ॲड. नलीन मजेठिया, विदर्भ प्रांत सचिव लोहरे प्रमुख अतिथी होते. नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. बिप्लव मजुमदार, जिल्हा संघटक रेखा भोंगाडे  व्यासपीठावर उपस्थित होते. 

नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अर्चना पांडे, वैशाली  तळवेकर, वर्षा तिवसकर, डॉक्टर संजीवनी चौधरी यांनी ग्राहक गीत सादर केले. प्रास्ताविक जिल्हा संघटक रेखाताई भोंगाडे यांनी केले, तर आयोजन आणि संचालन डॉ. संजीवनी चौधरी यांनी केले. 

नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. बिप्लव  मजुमदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन मुकेवार यांनी वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा घेतला. रोटरी क्लबचे प्रमुख सल्लागार तथा ग्राहक मंचचे माजी अध्यक्ष ॲड. नलिन मजेठिया यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा ग्राहक मंच नागपूरचे अध्यक्ष म्हणून त्यांना आलेले, विविध ग्राहकांच्या केसेसचे अनुभव सांगितले.  जिल्हा सचिव मुकुंद अडेवार यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे दिलेल्या ओळखपत्राबाबत माहिती देऊन मान्यवरांच्या हस्ते जागतिक ग्राहकदिनी ओळखपत्राचे वाटप केले व आभार व्यक्त केले. 

या वर्षीच्या जागतिक ग्राहक दिनाची थीम ही "न्याय संक्रमण ते शाश्वत जीवनशैली" अशी असून  सुलभ आणि परवडणाऱ्या  शाश्वत,  निरोगी जीवनशैली स्वीकारण्याबद्दल प्रांत सचिव लीलाधर लोहरे यांनी मार्गदर्शन केले. ॲड. पल्लवी खापरीकर यांनी ऑनलाइन तक्रारीकरिता वेगळा कक्ष तयार करण्यात यावा, अशी मागणी केली..

या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थच्या अध्यक्ष रो. मनीषा मंगतानी, सचिव रो. अली अकबर, ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष अर्चना पांडे, ग्रामीण अध्यक्ष कांचनमाला माकडे,व अन्य  पदाधिकारी उपस्थित होते.

हे वृत्त समाजमाध्यमावर सर्वत्र प्रसारीत होताच,श्यामकांत पात्रीकर यांच्या विचारांचे समर्थन करताना दीपक देशपांडे ,अध्यक्ष नागपूर विदर्भ प्रांत  जागृत ग्राहक राजा सामाजिक ग्राहक संघटना विदर्भ महाराष्ट्र राज्य यांनी, आधीच विदर्भाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष राहातं नाही त्यात अधिकारी कर्मचारी यांची कमतरता आणि त्यामुळे सुरू असणारी ओढाताण आणि सोपविलेले काम संपूर्ण लक्ष देऊन करण्याऐवजी मला काय त्याचे ? किंवा एक औपचारिकता म्हणून पूर्ण करण्याची गत काही काळापासून चालत आलेली परंपरा म्हणून कुणी फारसे गांभीर्याने घेतांना दिसत नाही, त्यामुळे जिल्हा ग्राहक संरक्षण  परिषदेचे कामकाज असो वा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कामकाज असो त्यात नमुद वेळेचे बंधन कुठे पाळले जाताना दिसतच नाही परिणामी चर्चेत येणाऱ्या  किंवा न्यायासाठी  दाखल होणाऱ्या एखाद्या विषयावर तातडीने कारवाई झाली आणि ग्राहकांना न्याय मिळाला असा प्रकार दिसतच नाही.

आज ग्राहक आणि ग्राहक संघटना जागृत झाले असून आपल्या व समाजाच्या रक्षणासाठी सक्षमतेने कार्य करीत असल्याने शासनदरबारी पाठपुरावा करून राष्ट्रीय ग्राहक दिन २४डिसेंबर व जागतिक ग्राहक हक्क दिन१५मार्च या दिवसाचे निमित्ताने शासनव्यवस्थेला ग्राहक जागृती कार्यक्रम घेण्यास बाध्य करीत आहेत, मग हे कार्यक्रम तहसील कार्यालयात एका सभागृहात औपचारिकता म्हणून आटोपून घेण्याचा प्रयत्न केला जात होता परंतू आता ग्राहक संघटनेच्या पाठपुराव्यामुळे हे कार्यक्रम जनतेच्या दरबारात घेण्यास बाध्य करण्यात येऊ लागले . परिणामी जनजागृती मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव होऊ लागली आहे. ह्याच न्यायाने ग्राहक संरक्षण परिषदा आणि ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कामकाज जर सुरू झाले तर .......तर भविष्यात या १९८६च्या ग्राहक संरक्षण अधिनियम व सुधारीत ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९च्या निर्मितीचे यश सर्वसामान्य ग्राहकांना कळायला लागेल व शोषण करणाऱ्या, लुबाडणूक करणाऱ्यांना धाक निर्माण होईल.

ग्राहकतीर्थ  स्व.बिंदूमाधव जोशी यांच्या स्वप्नातील कायद्याचे व न्यायाचे राज्य प्रस्थापित करता येईल , परंतू त्यासाठी आपापसात संवाद, चर्चा व एकत्रितपणे लढा देण्याची आवश्यकता आहे,हे समान उद्दिष्ट असणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे,असे स्पष्ट व रोखठोक मत दीपक देशपांडे, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा सामाजिक संघटना यांनी व्यक्त केले आहे.

यावर्षीची जागतिक ग्राहक दिनाची थीम  "न्याय संक्रमण ते शाश्वत जीवनशैली" हेच तर प्रतिपादीत करते व   यांचा पाठपुरावा करण्यासाठी नविन विचार करण्याची प्रेरणा  देत आहे.असे स्पष्ट करुन श्यामकांत पात्रीकर यांच्या विचारांचे समर्थन केले व यासाठी विदर्भात सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.