डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना तालुका मूल च्या अध्यक्ष पदी दत्तात्रय वारानशीवार यांची निवड
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना,प्रांत, जिल्हा व तालुका कार्यकारिणी यांची निवड.
.
चंद्रपूर,-दीपक देशपांडे
चंद्रपूर येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात नुकत्याच संपन्न झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक २६ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना च्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी मुन्ना तावाडे यांची नियुक्ती करण्यात आली.
तालुका मूल च्या अध्यक्ष पदी दत्तात्रय वारानशीवार
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना तालुका मूलच्या अध्यक्षपदी मूल येथील युवा पत्रकार दत्तात्रय वाराणशीवार यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी मेहुल मनियार ,सचिव पदी संजय मेकर्तीवार,व कोषाध्यक्ष म्हणून प्रमोद मशाखेत्री यांची निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे हस्ते नुकतेच दत्तात्रय वाराणशीवार व सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक इकबाल शेख, विदर्भ समन्वयक सतीश आकुलवार, विदर्भ कार्यकारिणी सदस्य व विदर्भ प्रांत सहसचिव दीपक देशपांडे, राज्य कार्यकारिणी सदस्य रजत दायमा, धाराशिव जिल्हा अध्यक्ष रमेश नेटके, नागपूर शहर अध्यक्ष अनिल बालपांडे आदींची उपस्थिती होती.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.
✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment