साहित्य संमेलनाध्यक्षांचे भाषण: माझे आकलन
साहित्य संमेलनाध्यक्षांचे भाषण:माझे आकलन
अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे परिसंवादाचे आयोजन
दरवर्षी होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा समस्त मराठी साहित्यप्रेमी आणि साहित्यिक मंडळींचा वार्षिक कुळाचारच असतो. त्यामुळे मराठीजन दरवर्षी या संमेलनात उत्साहाने सहभागी होत असतात.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा मराठीचा त्या वर्षासाठीचा राजदूत म्हणून ओळखला जातो असे सन्मानाने बोलले जाते. हे अध्यक्ष दरवर्षी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी साहित्यविश्वाला नवे दिशादर्शन देत असतात. त्यामुळेच हे अध्यक्ष आपल्या अध्यक्षीय भाषणात काय सांगतात याकडे सगळ्यांचेच लक्ष असते.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच ख्यातनाम मराठी साहित्यिक ताराबाई भवाळकर यांच्या अध्यक्षतेत पार पडले. प्रथेप्रमाणे त्यांचे अध्यक्षीय भाषण झाले आणि त्यावर विविध वर्तुळात विविध चर्चाही सुरू झाल्या आहेत.
या भाषणावर मान्यवर अभ्यासकांची काय मते आहेत ते जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय साहित्य परिषद, विदर्भ प्रांताच्या वतीने येत्या सोमवार दि. १० मार्च २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता मोतलग सभागृह, सेवा सदन विद्यालय परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर, येथे "साहित्य संमेलनाध्यक्षांचे भाषण: माझे आकलन" या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात मराठी साहित्यिक आणि समीक्षक डॉ. विजय राऊत, अलका मोकाशी आणि वृषाली देशपांडे हे आपली मते मांडणार असून ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
या परिसंवादाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी आणि या विचारमंथनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीचे अध्यक्ष एड. लखनसिंह कटरे कार्याध्यक्ष अविनाश पाठक महामंत्री एड. सचिन नारळे, कोषाध्यक्ष महेश आंबोकर, प्रमुख मार्गदर्शक प्रकाश एदलाबादकर प्रभृत्तींनी केले आहे. हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह धरूनही प्रक्षेपित केला जाणार असल्याचे देखील आयोजकांनी कळविले आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment