धुळवड विश्वविद्यालयाचा पदवीप्रदान समारंभ

 धुळवड विश्वविद्यालयाचा पदवीप्रदान समारंभ



होळीचा सण आपल्याकडे खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. होलिका दहनासोबत लोक आपल्या मनातील दुःख, नैराश्य, वाईट विचार जाळून टाकतात. आज या दिवशी सर्वांना चांगल्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा. होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे, आनंदाचे क्षण सारे..

पदवीप्रदान समारंभ



बुरा ना मानो होली हैं, पदवीप्रदान समारंभ, होलिकोत्सव २०२५साठी धुळवड विश्वविद्यालयाच्या प्रांगणात आपणा सगळ्यांना साजेसा रंग फासून आपले स्वागत आणि अभिनंदन करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मिळेनासे झाले होते, परंतू आश्वासनांची खैरात वाटायला सुरुवात केली आणि नको नको म्हणेस्तोवर या पाहुण्यांनी हजेरी लावली त्यामुळे आजच्या कार्यक्रमातील आयोजनाची पुरती वाट लागली आहे,या घिसडघाईत कुणाची पदवी कुणाच्या गळ्यात पडलीच तर ती आपले नाव पाहून बदलून घेण्याची तसदी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे.

महाफुटीमुळे कोणाच्या गळ्यातील वरमाला कुणाच्या गळ्यात पडलीच तरीही ती आपलीच समजून स्विकारुन घेणे महाफुटिमुळे बंधनकारक करण्यात आले आहे.यामुळेच काही पदव्या बिननावाच्याही वितरीत करण्यात येणार आहेत त्या आपल्या समजून स्विकारुन घेणे आवश्यक आहे.

या पदवीप्रदान समारंभाचे फुलकुरु आहात ...... आपणच 

त्यासाठीच आम्ही घेऊन आलोय,

भव्य पदवीप्रदान समारंभ

मूल, रंगराव परमानंद घासलेटे

मूलनगरीमधील, गुणवंत, प्रज्ञावंत, कलावंत, कीर्तीवंत , नामवंत, यांच्या  कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी पदवीप्रदान समारंभ आज दिनांक १४/०३/२०२५ रोजी दुपारी ठिक १२वाजता धुळवडीच्या शुभमुहूर्तावर साजरा होत आहे 

या सोहळ्यात आपण अगत्याने आपापल्या घरी बसून आँनलाईन सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती.

हेच निमंत्रण आणि हाच सोहळा...

या सोहळ्यात खालील मान्यवर मंडळींना, ढोलताशांच्या गजरात, धुळवडीच्या रंगांच्या उधळणीसह पाण्याची  गंगा वाहवत वडा पुरणाच्या मेजवानीत *पाणी वाचवा* चा संदेश देत ,जाळलेल्या झाडांमुळे झालेली जंगलतोड थांबविण्यासाठी *वृक्ष लागवडीचा आणि संवर्धनाचा* संदेश देत  एक कश - झुरका मारत कालच रात्रीपर्यंत आणुन ठेवलेल्या मदिरेचा घोट घेत, *नशाबंदी-दारुबंदी* ची गरज बोलून दाखविणाऱ्या आणि जिवंतपणी कत्तल केलेल्या  अंडी,  मासे ,कोंबड्या आणि शेळ्या मेंढ्या, बकऱ्यांसह, बड्याच्या मटनवर ताव मारत *गोधनाच्याही संरक्षणाच्या* बाता करणाऱ्या महानुभावांच्या उपस्थितीत पदवीप्रदान करण्यात येत आहे.

स्थळ :-तुम्ही जिथे असाल तिथे.

अट:-तुमच्याजवळ मोबाईल फोन डाटासह उपलब्ध असावा., आणि तुम्ही व्हाट्सअप वर चॅटिंग करणे अत्यावश्यक

चला तर मग.......आपण पदवीप्रदान समारंभ सुरू करुयात....

त्यापूर्वी एक जोरदार नारा देऊया...


बूरा ना मानो होली हैं||......*हम मतवालोंकी.... आणि.... आणि.......होऊ दे धिंगाणा.....५..४...३...२...१...


..... आणि पहिल्या पुरस्काराच्या मानकरी आहेत......ज्यांनी महिला जगतात नावलौकिक मिळविला आहे त्या आहेत, सुवर्णपदक विजेत्या...........

............ राजकीय परिपटलावर उभारणारे एक नेतृत्व.....


१.डाॅ.किरण कापगते:-मी आहे आशावादी. यानंतर ० .२७%ने माघारलेल्या दुसऱ्या सुवर्ण पदकाच्या विजेत्या आहेत...

२..संध्याताई गुरनूले,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष:-नाही बढती तर जि.प.तरी पाहिजेच.

थोड्या०.७३%ने माघारलेल्या आहेत...

३.रत्नमाला भोयर,माजी नगराध्यक्षा मूल:-आपली झाडीबोलीच चांगली

एक उंच भरारी घेत चर्चेत आलेल्या आहेत.

४.:-........आपल्या कामाशी मतलब.

नाव नको पण काम बोलले पाहिजे हा विचार घेऊन पुढे येताहेत....

५.वंदना आगरकाटे:- अडल्यानडल्यांची गाथा

६.अर्चना मार्कंडी चावरे:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला अध्यक्षा:-कुछ कर दिखाना है|

७.उषाताई शेंडे,माजी नगराध्यक्षा:-मिळेल ही आशा

८ ............. अजून सिद्ध व्हायचंय.

राजकीय व्यासपीठावर पुन्हा आपले अस्तित्व पणाला लावण्यासाठी धडपडताहेत....

९.प्रकाश पाटील मारकवार,माजी जि.प. अध्यक्ष:-तयारीला लागा , मी पुन्हा येतोय ,एकला चलो रे चा नारा घेऊन

६.विनोद अहिरकर,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष:- आपलं कोण  ऐकतयं

७.चंदू मारगोनवार,माजी पं.स.मूल सभापती:-चालतयं की

८.दशरथ वाकुडकर,माजी पं.स.मूल, उपसभापती:-तेवढं इकडे बोलून घ्या...


९.राकेश रत्नावार, सभापती, कृउबास  मूल:-अशानं कसं होणार?


१०.राजेंद्र कन्नमवार, उपसभापती, कृउबास मूल:-तसा मी निष्ठावानच


११.चंदू पाटील मारकवार, उपसरपंच, राजगड:- माझ्या गावाची माझ्यापासून सुरुवात..


१२.रविंद्र कामडी, सरपंच, कोसंबी:- शेवटी सारे काही उघडं


१३ प्रविण मोहुर्ले:-भाऊ करा लागते


१४.नंदकिशोर रणदिवे,माजी उपाध्यक्ष,न.प.मूल:- होणारच तू फक्त ...

१५.प्रभाकर भोयर, शहराध्यक्ष,भाजप मूल:- मागे राहणेच चांगले..


१६.गुरु गुरनूले, तालुका अध्यक्ष, काॅंग्रेस कमेटी मूल, पत्रकार:-... माझंच अडते... तर....


१७.सुमित समर्थ, राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष :-आता घरुनच


१८.मंगेश पोटवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे मूल तालुका अध्यक्ष:- दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच


१९.प्रशांत गट्टूवार,उबाठा शिवसेना मूल तालुका अध्यक्ष :-प्रयत्न करु...


२०.मोती टहलियानी, माजी नगरसेवक तथा माजी मूल कृउबास. सभापती:-एकबार कुछ कर दिखाना है.....

२१.......... अजून बरेच काही मिळवायचं आहे.

२२.विजय सिद्धावार, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार:-.... तुम्ही व्यक्त व्हा


२३.संजय पडोळे, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार:- नाही गेलो तर .. नक्की


२४.महेश पानसे, पत्रकार:- घडले आणि सोडून गेले कां?


२५ ......मी येणारच


२६.चंद्रकांत मनियार, निवृत्त प्राध्यापक, पत्रकार:-दोन्ही हाती पुऱ्या


२७.सतिश आकुलवार:-फक्त डिजीटल मिडियासाठी


२८ .........पेंग घालवण्यासाठी

२९. .....केवळ औपचारिकताच


३०......पर दिल ना जले.


 आणि विशेष पदवी प्राप्त विद्यार्थी आहेत,



१.मान.आमदार सुधीर मुनगंटीवार:-पक्षादेश मान्य, सर्व शक्ती पणाला लावणार!


२ खासदार ,प्रतिभा धानोरकर:- काय करु भाऊ?


३.आमदार देवराव भोंगळे:- वेळ नाही आली अजून


४.आमदार बंटी भांगडीया:-मी होतो तिथेच आहे


५.आमदार किशोर जोरगेवार:-संधी मिळेलच


६.आमदार विजय वडेट्टीवार:-तळ्याची चव बघायची आहे


७.आमदार करण देवतळे:-आता शिकतोय

 बुरा ना मानो होली हैं||

ह्या प्रमुख मान्यवरांना या पदवीप्रदान समारंभात पदवी प्रदान करण्यात आली आहे, उर्वरितांना त्यांचें त्यांचे स्वतःचे महाविद्यालयात पदवी कासवगतीने!क्षमा करा, गोगलगाय गतीने रवाना करणार आहोत ,चिंता करावीच.

कसा वाटला? आमचा पदवी प्रदान सोहळा हे कळविण्यास नक्की विसराच . कारण आपण पुन्हा वर्षभरानेच भेटणार आहोत.

आपण आलात,या पदवीप्रदान सोहळ्याचा मनमुरादपणे आनंद घेतलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद!पण आभार  मानणार नाही, कारण आपली पुन्हा पुन्हा भेट होईलच.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

 ✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.