जागृत ग्राहक राजा सामाजिक संघटना,विभागीय अध्यक्ष नियुक्ती जाहीर.

 नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्षपदी दीपक देशपांडे तर कोकण विभाग अध्यक्षपदी पवन पोलसानी यांची नियुक्ती.

दीपक देशपांडे 


               पवन पोलसानी यांच्याकडे नव्याने कोकण विभाग अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे  यात रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे.

जागृत ग्राहकराजा संघटनेच्या प्रांत कार्यकारिणीची नुकतीच ऑनलाईन मीटिंग झाली. मीटिंगमध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. अधिवेशन कसे झाले ? पुढच्या अधिवेशनात काय असावे? याबाबतची असा सविस्तरपणे चर्चा झाली.संघटनेचे पहिलेच अधिवेशन यशस्वी पार पडले याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

        या बैठकीत ठरल्यानुसार सांगली येथील किशोर लुल्ला, चंद्रपूर येथील दीपक देशपांडे, पुणे येथील सविता बलकवडे यांना महाराष्ट्र प्रांत कार्यकारणीवर घेण्याचे निश्चित करण्यात आले.

  दीपक देशपांडे यांची नागपूर विभाग अध्यक्षपदी निवड करण्याचे निश्चित झाले ,तर पवन पोलसांनी यांच्याकडे कोकण विभागाचे अध्यक्षपद देण्याचे निश्चित करण्यात आले. 

 सविता बलकवडे यांना राज्य कार्यकारणी महिला सचिव या पदावर निवड करण्याचे निश्चित करण्यात आले.

        तसेच प्रत्येक जिल्ह्याला एक पालक असावा अशी संकल्पना मांडण्यात आली. त्यालाही सर्वांनी मान्यता दिली. या संकल्पनेनुसार काही जिल्ह्यांना खालील प्रमाणे पालक पालकत्व देण्यात आलेले आहे. 

त्यात पुणे जिल्हा -दिलीप फडके, सातारा जिल्हा-दिलीप पाटील, सांगली जिल्हा -प्रा.नागनाथ स्वामी,

 अहिल्यानगर जिल्हा-विद्याधर कुलकर्णी,

कोल्हापूर जिल्हा-प्रा रामानंद पुजारी पुणे शहर - सौ नयन चव्हाण यांना या जिल्ह्यांचे पालकत्व घेऊन त्या त्या विभागात आपली रचना तयार करणे, सर्व पदाधिकारी तयार करणे, व काम सुरू करणे असे करायचे ठरले आहे.

 या कार्यक्रमात मा.किशोर लुल्ला यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. आपण मिटिंग चे निमंत्रण देऊनही कार्यकर्ते उपस्थित राहत नाही याबाबत खेद व्यक्त केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचा एक अभ्यास वर्ग व्हावा अशी संकल्पना ही त्यांनी मांडली.यापुढील मिटींगला सर्व तालुका,जिल्हा अध्यक्ष व संघटक उपस्थित राहतील यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही ठरवण्यात आहे.संघटनेची दरमहा ऑनलाइन मिटिंग घेण्यात येईल असेही ठरले.

महाराष्ट्र राज्य प्रांत कार्यकरिणी ची पुढील बैठक सातारा जिल्हा येथे एप्रिलमध्ये होईल असे ठरवण्यात आहे.त्या बैठकीत नवीन रचनाही करण्यात येणार असल्याचे ठरले 

बैठकीचा समारोप प्रा. नागनाथ स्वामी यांनी केला.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.